शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन प्रेमीयुगुलाचे छत्तीसगडवरून पलायन

By admin | Updated: July 24, 2016 02:09 IST

एकमेकांवर प्रेम करताना अचानक घरच्यांनी केलेल्या विरोधामुळे छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातील दोन अल्पवयीन युवक-युवतीने घर सोडून पलायन केले.

नागपूर रेल्वेस्थानकावर आढळले : ‘आरपीएफ’ने केले चाईल्ड लाईनच्या स्वाधीन नागपूर : एकमेकांवर प्रेम करताना अचानक घरच्यांनी केलेल्या विरोधामुळे छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातील दोन अल्पवयीन युवक-युवतीने घर सोडून पलायन केले. दुपारी २ वाजता ते नागपूर रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक ४/५ वर संशयास्पदरीत्या आढळल्याने रेल्वे सुरक्षा दलाने त्यांना ठाण्यात आणून त्यांना बाल सुधारगृहात रवाना केले. छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातील भुरी तालुक्यातील युवक कौस्तुभ आणि युवती रिना (बदललेले नाव) हे एकमेकांवर प्रेम करीत होते. परंतु त्यांचे प्रेमप्रकरण त्यांच्या घरच्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्या प्रेमाला विरोध झाला. काही झाले तरी घरच्यांचे न ऐकता एकमेकांसोबत राहायचे असे ठरवून त्यांनी आपापले घर सोडले. तेथून त्यांनी थेट नागपूर रेल्वेस्थानक गाठले. शनिवारी दुपारी २ वाजता ते प्लॅटफार्म क्रमांक ४/५ वर मुंबई एण्डकडील भागात ते संशयास्पद स्थितीत आढळले. ड्युटीवर असलेले आरपीएफ जवान बी. एस. यादव आणि चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधी प्रीती चांदेकर यांना त्यांच्यावर शंका आली. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपले नाव सांगून घरून निघून आल्याची माहिती दिली. लगेच त्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात आणण्यात आले. तेथे उपनिरीक्षक कृष्णा राय यांनी त्यांची चौकशी करून त्यांच्या पालकांचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर त्यांना चाईल्ड लाईनच्या स्वाधीन करण्यात आले.(प्रतिनिधी)