शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
3
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
4
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
5
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
6
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
7
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
8
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
9
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
10
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
11
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
12
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
13
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
14
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
15
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
16
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
17
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
18
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
19
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
20
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार

ऐतिहासिक वाफेच्या इंजिनची दुरवस्था

By admin | Updated: August 26, 2015 03:09 IST

समारंभपूर्वक नागपूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागात स्थापन करण्यात आलेल्या ऐतिहासिक नॅरोगेज वाफेच्या इंजिनला अवकळा प्राप्त झाली आहे.

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष : समारंभपूर्वक केली होती स्थापनानागपूर : समारंभपूर्वक नागपूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागात स्थापन करण्यात आलेल्या ऐतिहासिक नॅरोगेज वाफेच्या इंजिनला अवकळा प्राप्त झाली आहे. या इंजिनखालील जागा भिकाऱ्यांची आणि दारू पिणाऱ्यांचा अड्डा झाली असून उखडलेली फरशी, कचरा अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे या इंजिनच्या सौंदर्यात बाधा निर्माण झाली आहे.आधुनिक काळात सर्वच रेल्वेगाड्या विजेवर धावत आहेत. मोजक्याच रेल्वेगाड्या कोळशावर, डिझेलवर धावतात. त्यामुळे पुरातन काळात रेल्वेचे इंजिन वाफेच्या शक्तीवर धावत होते, ही बाबही आधुनिक पिढीला काही दिवसांनी पटणार नाही. त्यामुळे वर्धा ते आर्वी मार्गावर धावलेल्या एका वाफेच्या इंजिनची डागडुजी करून हे ऐतिहासिक इंजिन प्रवाशांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्त्कालीन ‘डीआरएम’ बृजेश दीक्षित यांनी समारंभपूर्वक नागपूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागात या वाफेच्या इंजिनची स्थापना केली होती. या इंजिनला बुलंद असे नावही देण्यात आले. परंतु काही दिवसानंतर या इंजिनला अवकळा प्राप्त झाली. इंजिनच्या सभोवताल लावलेल्या साखळ्या चोरट्यांनी चोरून नेल्या. इंजिनखालील फरशी निघाली आहे. या ठिकाणी असामाजिक तत्त्वांचा उपद्रव वाढला आहे. इंजिनखाली बसून असामाजिक तत्त्व उघड्यावर दारू पितात तर रात्रीच्या वेळी भिकारी या इंजिनखाली झोपतात. तेथेच घाणही पसरवितात. त्यामुळे ज्या उद्देशाने हे इंजिन येथे स्थापन करण्यात आले, त्या उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे. याबाबत रेल्वे प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसले आहे. (प्रतिनिधी)लोहमार्ग पोलिसांना सूचना देऊवाफेच्या इंजिनाला अवकळा प्राप्त झाल्याची बाब मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ ओ.पी. सिंह यांच्या निदर्शनास आणून दिली असता, याबाबत लोहमार्ग पोलिसांना सूचना देऊन या इंजिनखाली असामाजिक तत्त्वांचा वावर बंद करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.