शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

व्रण मिटतील; वेदना कशा मिटविणार?

By admin | Updated: May 24, 2014 01:14 IST

सिरिया कुटुंब येथे राहायला आले त्या क्षणांपासूनच त्यांनी सर्वांची मनं जिंकून घेतली़ अत्यंत मनमिळावू स्वभाव व कुणाच्याही मदतीला धावून जाणार्‍या या कुटुंबावर काळ असा घाला घालेल, असे

सिरिया कुटुंबीयांच्या मृत्यूमुळे शेजार्‍यांचा आक्रोश

आनंद डेकाटे - नागपूर

सिरिया कुटुंब येथे राहायला आले त्या क्षणांपासूनच त्यांनी सर्वांची मनं जिंकून घेतली़ अत्यंत मनमिळावू स्वभाव व कुणाच्याही मदतीला धावून जाणार्‍या या कुटुंबावर काळ असा घाला घालेल, असे स्वप्नातही कधी वाटले नाही़ जीव वाचविण्यासाठी या कुटुंबीयांनी लिफ्ट जवळ केली अन् या लिफ्टनेच त्यांना सर्वांशी दूर करून टाकले़ आज या इमारतीच्या सर्वांगावर त्यांच्या मृत्यूचे व्रण दिसताहेत़ हे व्रण उद्या मिटतीलही कदाचित़ पण, त्यांच्या जाण्याने ज्या वेदना होताहेत त्या कशा मिटवायच्या, असा अस्वस्थ करणारा सवाल सिरिया कुटुंबीयांचे शेजारी करीत आहेत़ कालपर्यंत हसत-खेळत असलेल्या एका कुटुंबाच्या अशा अकाली जाण्याने आज अवघा ‘अंजिक्य प्लाझा’ नि:शब्द झाला आहे़ लोकमत प्रधिनिधीने घटनास्थळाला भेट दिली. तेव्हा उपस्थितांनी आंखोदेखा हाल सांगितला. ते म्हणाले, अचानक फ्लॅटमध्ये सर्वत्र धूर झाला. फ्लॅटचा दरवाजा उघडून खाली पाहिले असता आगीचा भडका उडताना दिसत होता. यातच सिरिया कुटुंबीयांचा वाचवा...वाचवा... म्हणून आवाज कानावर येत होता. सर्वत्रच धावपळ सुरू होती, प्रत्येक जण आपला जीव वाचविण्यासाठी धावपळ करीत होता. काय सुरू आहे, काही कळायला मार्गच नव्हता. केवळ फ्लॅटमध्ये आग लागली इतकेच समजत होते. या आगीत सिरिया कुटुंबीयांचा असा दुर्दैवी अंत होईल, अशी स्वप्नातही कल्पना नव्हती. झाले ते खूपच वाईट होते. इमारतीमध्ये लागलेली आग आम्ही काही वर्षानंतर कदाचित विसरून जाऊ परंतु ही दुर्दैवी घटना मात्र मरेपर्यंत मनात घर करून राहील. ती विसरता येणे शक्य नाही. सिरिया यांच्या फ्लॅटमधील शेजारी आणि वस्तीतील लोकांनी आपल्या मनातील ही सल बोलून दाखविली. गोकुळपेठ बाजारामागील गल्लीत ‘अजिंक्य प्लाझा’ नावाची चार माळ्याची इमारत आहे. या इमारतीमध्ये एकूण १३ कुटुंबे राहतात. त्यांचे एकमेकांशी अतिशय चांगले संबंध आहेत. या इमारतीमध्ये गुरुवारी रात्री आग लागली. आपला जीव वाचविण्याच्या प्रयत्नात येथील सिरिया कुटुंब लिफ्टने खाली येत असताना आगीत होरपळून मरण पावले. यामध्ये सिरिया कुटुंबीयांचे प्रमुख सलीला, त्यांची सून रागिणी, नातू निरांश, मुलगी श्रुती आणि तिची मुलगी सायंतिका यांचा होरपळून दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे फ्लॅटधारकांसह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. परिणय फुके यांची धावपळ नगरसेवक परिणय फुके यांना या घटनेबाबत रात्री १२.३० वाजता माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. रात्रीपासून त्यांनी येथील फ्लॅटधारकांना सावरण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळपासून ते घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग लागल्याने सर्वत्र वाहनांचा कचरा जमा झाला होता. फुके यांनी मनपा कर्मचार्‍यांच्या मदतीने संपूर्ण कचरा साफ करून घेतला. महापौरांनी दिली भेट दरम्यान महापौर अनिल सोले यांनीसुद्धा सकाळी घटनास्थळी भेट दिली. योग्य पंचनामा करून आगीचे कारण शोधण्यात यावे. तसेच तात्पुरता विद्युत पुरवठा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. दरम्यान आ. सुधाकरराव देशमुख यांनी सुद्धा घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी येथील फ्लॅटधारकांनी त्यांना जनरेटर उपलब्ध करून देण्याची विनंती केली. घातपाताची शक्यता फ्लॅटधारकांपैकी काही लोकांनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली नसून घातपाताची शक्यता वर्तविली आहे. एकाच वेळी इतक्या वाहनांना आग कशी लागते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.