शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

समता, महिलातही एमपीआयडी

By admin | Updated: January 19, 2016 03:57 IST

आर्थिक घोटाळ्यामुळे बंद पडलेल्या समता, महिला व अन्य सहकारी संस्थांच्या प्रकरणातही महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध

हायकोर्टाची स्वत:च दखल : ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या संस्थानागपूर : आर्थिक घोटाळ्यामुळे बंद पडलेल्या समता, महिला व अन्य सहकारी संस्थांच्या प्रकरणातही महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम(एमपीआयडी)अंतर्गत गुन्हा नोंदविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून, पोलीस महासंचालक व मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी यासंदर्भात परीक्षण करून पुढील कारवाई करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी सोमवारी दिले.सर्वोच्च न्यायालयाने ‘सोमा वि. आंध्र प्रदेश शासन’ प्रकरणात सहकारी संस्थांतील आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणातही एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. उच्च न्यायालयाने श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा ठगबाज समीर जोशीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर विषयाची व्याप्ती वाढवून वरीलप्रमाणे निर्देश दिले. हे प्रकरण आता फौजदारी रिट याचिका म्हणून हाताळण्यात येणार आहे. पोलीस महासंचालक व मुख्य न्यायदंडाधिकारी यांना उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करून दोन आठवड्यात उत्तर सादर करायचे आहे. काही वर्षांपूर्वी समता, महिला व अन्य काही सहकारी संस्थांनी गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली आहे. गुंतवणूकदारांना अद्याप त्यांच्या ठेवी परत मिळालेल्या नाहीत. आयुष्यभराची कमाई बुडल्यामुळे अनेकांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.(प्रतिनिधी)समीर जोशीचा जामीन अर्ज मागेएमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यामुळे उच्च न्यायालयाने समीर जोशीला जामीन देण्यास नकार दिला. परिणामी जोशीने सोमवारी संबंधित अर्ज मागे घेतला. समीरने २००३ मध्ये गुंतवणूक क्षेत्रात प्रवेश केला होता. त्याने अनेक कंपन्या नुकसानीत सुरू असतानाही फायद्याचे प्रलोभन दाखवून शेकडो गुंतवणूकदारांना फसविले. या प्रकरणात राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात १४ सप्टेंबर २०१३ रोजी भादंविच्या कलम ४२०, ३४ व महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियमाच्या कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. समीरला १५ आॅक्टोबर २०१३ रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहात आहे. समीरतर्फे अ‍ॅड. आदिल मिर्झा तर शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे व नीरज जावडे यांनी बाजू मांडली.