शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमधील भेदभाव रोखण्यासाठीही समानता नियमावली करावी, डाॅ. सुखदेव थोरात यांची मागणी

By आनंद डेकाटे | Updated: January 31, 2026 22:42 IST

 विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) उच्चशिक्षण संस्थांमध्ये समानता प्रोत्साहन नियमावली २०२६ संदर्भात डाॅ. सुखदेव थोरात यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत त्यात काही सुधारणा सूचविल्या आहेत.

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च शिक्षण संस्थांसोबतच प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये सुद्धा प्रचंड भेदभाव केला जातो. शालेय विद्यार्थी हा भेदभाव निमुटपणे सहन करतात. ते बोलूही शकत नाही. त्यामुळे सरकारने शाळांमध्ये एससी, एसटी, अल्पसंख्याक व मुलींनी अनुभवलेल्या भेदभावाचे स्वरूप व प्रकार समजून घेण्यासाठी संशोधन करावे आणि त्यानुसार भेदभाव दूर करण्यासाठी नियमावली तयार करावी, अशी मागणी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष आणि फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन फाॅर सोशल जस्टीस, सेक्युलॅरिझम ॲण्ड डेमोक्रसी या संस्थेचे अध्यक्ष डाॅ. सुखदेव थोरात यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केली. 

 विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) उच्चशिक्षण संस्थांमध्ये समानता प्रोत्साहन नियमावली २०२६ संदर्भात डाॅ. सुखदेव थोरात यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत त्यात काही सुधारणा सूचविल्या आहेत. त्यांनी सांगितले की, २०१२ मध्ये अशीच नियमावली लागू करण्यात आली होती. सध्याच्या नियमाला काही सवर्णांनी विरोध करीत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. जातीआधारित भेदभावाची व्याख्या काढण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. या मागणीला आमचा विरोध आहे. अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास वर्गाचे जातीय भेदभावाचे स्वरूप वेगळे असल्यामुळे ही तरतूद करणे आवश्यक आहे. त्यामुळे परिशिष्ट ३ (क)मध्ये जी व्याख्या आहे, ती कायम ठेवण्यात यावी.  उच्च शिक्षण संस्थांमध्ये होणाऱ्या भेदभावाच्या स्वरूपाची यादी देण्यात यावी.

२०१२च्यातरतुदीमध्ये २८ स्वरूपाचे भेदभाव स्पष्ट करण्यात आले होते.  भेदभावाच्या सध्याच्या नियमावलीमध्ये ही जबाबदारी समता समितीकडे सोपविण्यात आली आहे. याला आमचा विरोध आहे.  सध्याच्या तरतुदीमध्ये केवळ विद्यापीठ अनुदानाच्या अंतर्गत येणाऱ्या संस्थांचा समावेश झाल्याचे दिसून येते. तेव्हा शिक्षण मंत्रालय, कृषी मंत्रालय, कुटुंब कल्याण, आरोग्य मंत्रालय आणि विधी मंत्रालययांच्या अखत्यारितील सर्व शैक्षणिक संस्थांचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व शैक्षणिक संस्थांना लागू होतील असे एकसंध नियम लागू करावेत.

 संस्थेचा प्रमुख जो अंतिम निर्णय घेईल ता शिफारस करणाऱ्या समता समितीचा अध्यक्ष नसावा. तसेच समितीमध्ये एससी, एसटी, ओबीसी इतर मागासवर्ग, दिव्यांग आणि महिला या सर्वांचे एकूण किमान ५० टक्के प्रतिनिधित्व असावे, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. युजीसीच्या नियमावलीमध्ये सुधारणांसाठी न्यायालयाची एक समिती स्थापन करण्याची शक्यता आहे. त्या समितीमोर फेडरेशनतर्फे या सर्व सूचना व शिफारशी सादर केल्या जातील, असेही डाॅ. थोरात यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Implement equality rules in schools to prevent discrimination: Thorat

Web Summary : Dr. Sukhdev Thorat demands government research and rules to address discrimination against marginalized students in schools. He advocates for retaining caste-based discrimination definitions in UGC guidelines and expanding regulations to all educational institutions, ensuring diverse representation in equality committees.