शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

राज्यातील ६१ हजार हेक्टर वनक्षेत्रावर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 01:29 IST

प्रशासकीय अनास्थेमुळे सरकारी जागांवर होत असलेले अतिक्रमण वाढत असल्याचे दिसून येते. राज्याच्या वनक्षेत्रालादेखील अतिक्रमणाने ग्रासले असून थोडेथोडके नव्हे तर ६१ हजार हेक्टरहून अधिक वनक्षेत्रावर अतिक्रमण झालेले आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक अतिक्रमण धुळ्यात : वनक्षेत्राला अतिक्रमणाने ग्रासले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रशासकीय अनास्थेमुळे सरकारी जागांवर होत असलेले अतिक्रमण वाढत असल्याचे दिसून येते. राज्याच्या वनक्षेत्रालादेखील अतिक्रमणाने ग्रासले असून थोडेथोडके नव्हे तर ६१ हजार हेक्टरहून अधिक वनक्षेत्रावर अतिक्रमण झालेले आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे विचारणा केली होती. राज्यातील किती वनक्षेत्रावर अतिक्रमण आहे, किती वर्षांपासून अतिक्रमण आहे, तसेच २०१८ मध्ये किती प्रमाणात अतिक्रमण हटविण्यात आले, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार वनविभागातील एकूण वनक्षेत्रापैकी ६१,७८०.२३३ हेक्टर वनक्षेत्रावर अतिक्रमण झाले आहे. यातील सर्वाधिक वनक्षेत्र हे वनविभागाच्या अंतर्गत येते. उर्वरित अतिक्रमण हे महसूल विभाग, राज्य वनविकास महामंडळ तसेच वनविभागाच्या अधिपत्याखाली आलेल्या खासगी वनांच्या क्षेत्रावर झालेले आहे.१९७८ नंतर राज्यातील वनजमिनींवर झालेल्या अतिक्रमणापैकी ९३८.१९६ हेक्टर अतिक्रमण जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत हटविण्यात आले. राज्यातील सर्वात जास्त धुळे वनवृत्तात २०,९२५.१७० हेक्टर वनक्षेत्रावर अतिक्रमण आहे. त्याखालोखाल गडचिरोली (८,५८२.०४९ हेक्टर), औरंगाबाद (६,५८०.७६० हेक्टर), चंद्रपूर (५,२४९.११६ हेक्टर) यांचा क्रमांक लागतो.नागपूर वनवृत्तात २,८०८.९५१ हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण झाले आहे.तीन महिन्यांच्या कालावधीत सव्वाशे हेक्टर अतिक्रमणजानेवारी ते मार्च २०१८ या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यातील १३०.३५८ हेक्टर वनक्षेत्रावर अतिक्रमणदेखील झाले. धुळे जिल्ह्यात सर्वाधिक ३३.९६१ हेक्टर वनक्षेत्रावर २३ अतिक्रमणे झाली. तर चंद्रपूर जिल्ह्यातील ३२.०९९ हेक्टर वनक्षेत्रात १६ अतिक्रमणे झाली. ठाणे येथे १४.८०८ हेक्टर वनक्षेत्रावर एकूण ७५९ अतिक्रमणे झाली.राज्यात २० टक्के वनक्षेत्रराज्यात सद्यस्थितीला ६१ हजार ७२३ चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत हे प्रमाण २०.०६ टक्के इतके आहे. सर्वाधिक ५५,४३३.२५ चौरस किमी वनक्षेत्र हे वनविभागाच्या अधिपत्याखाली आहे. तर महसूल विभाग (०.५१ %), महाराष्ट्र वन विकास महामंडळ (१.१५ %) व वनविभागाच्या अधिपत्याखाली येणारी खासगी वने (०.३८ %) यांच्या अंतर्गत उर्वरित वनक्षेत्र येते.सर्वाधिक वनक्षेत्रावर अतिक्रमणवनवृत्त                  अतिक्रमण (हेक्टरमध्ये)धुळे                        २०,९२५.१७०गडचिरोली            ८,५८२.०४९औरंगाबाद            ६,५८०.७६०मुंबई                    ५,९३३.६४४चंद्रपूर                 ५,२४९.११६नाशिक                ३,८११.५७८नागपूर               २,८०८.९५१

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणforestजंगल