शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

जिचकार कुटुंबाचे अतिक्रमण

By admin | Updated: June 13, 2014 01:28 IST

बोखारा नाल्यावरील अतिक्रमित भागात दिवंगत माजी मंत्री श्रीकांत जिचकार यांची मुलगी मैत्रेयी व मुलगा याज्ञवल्क्य यांच्या नावाने जागा असल्याचा खुलासा झाला आहे. तहसीलदार (ग्रामीण) शोभाराम मोटघरे यांनी

बोखारा नाल्यावरील अतिक्रमण : प्रशासनाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्रनागपूर : बोखारा नाल्यावरील अतिक्रमित भागात दिवंगत माजी मंत्री श्रीकांत जिचकार यांची मुलगी मैत्रेयी व मुलगा याज्ञवल्क्य यांच्या नावाने जागा असल्याचा खुलासा झाला आहे. तहसीलदार (ग्रामीण) शोभाराम मोटघरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही बाब पुढे आली आहे. सर्व्हे क्र. १०३-२ ही १.०६ हेक्टर जागा मैत्रेयी व याज्ञवल्क्यच्या नावाने आहे.८० फूट रुंदीचा भोकारा नाला अतिक्रमणामुळे १० फुटांचा झाला आहे. न्यायालयाने गेल्या तारखेला या प्रकरणाची चौकशी करून ११ जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्तिश: उपस्थित राहून स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मोटघरे यांनी शासनाच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर केले. भूमी अभिलेख (ग्रामीण) विभागाचे उपअधीक्षक, नायब तहसीलदार (ग्रामीण), महसूल निरीक्षक आदी अधिकाऱ्यांनी ६ जून रोजी भोकारा नाल्यावरील अतिक्रमणाची चौकशी केली. त्यांना भोकारा नाल्याच्या ०.३७ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण आढळून आले आहे. अतिक्रमित भागात मैत्रेयी व याज्ञवाल्क्यसह संतकृपा सहकारी गृहनिर्माण संस्था, ताजकृपा सहकारी गृहनिर्माण संस्था, महालक्ष्मी सहकारी गृहनिर्माण संस्था, हिंद हॉटेल आदींच्या नावानेही जमीन असल्याची माहिती मोटघरे यांच्या प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेमोरे यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. शासकीय अधिकारी व भूमाफिया यांनी मौजा बोखारा येथील नाला बुजवून, त्यावर ले-आऊट पाडून भूखंड विकले आहेत. २००४ मध्ये आमदार शोभा फडणवीस यांनी विधानसभेमध्ये बोखारा नाल्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न उपस्थित केला होता. १७ जून २०१३ रोजी नायब तहसीलदारांनी गोधनी रेल्वेचे मंडळ अधिकारी व बोखाराचे तलाठी यांना नाल्यावरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. तसेच पोलीस उपायुक्त, ग्रामसेवक व ग्रामपंचायतला पत्र लिहिले होते. परंतु गेल्या १० वर्षांत काहीच झाले नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांनी याचिकाकर्त्यातर्फे तर मध्यस्थ अ‍ॅड. सतीश उके यांनी स्वत: बाजू मांडली.(प्रतिनिधी)