शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेची कसोटी

By admin | Updated: May 16, 2014 00:45 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार पार पाडण्यासाठी कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेची कसोटी लागणार आहे. यात कर्मचारी कमी पडले तर वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे.

मतमोजणीचे वेळापत्रक: तरणार की कोलमडणार?

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार पार पाडण्यासाठी कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेची कसोटी लागणार आहे. यात कर्मचारी कमी पडले तर वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला कळमना मार्केट यार्डमध्ये सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या चौकटीत जिल्हा प्रशासनाने मतमोजणीचे नियोजन केले आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्र आणि टेबलची एकूण संख्या यावरून फेर्‍यांची संख्या निश्‍चित करण्यात आली आहे. या प्रमाणानुसार नागपुरात १५ तर रामटेकमध्ये १८ फेर्‍या होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्हाधिकार्‍यांनी सांगितल्यानुसार पहिल्या फेरीच्या मतगणनेला साधारणपणे ४५ मिनिट व त्यानंतरच्या प्रत्येक फेरीला २0 ते २५ मिनिट इतका वेळ लागण्याची शक्यता आहे. या वेळापत्रकानुसार अंदाज बांधला तर नागपूरच्या मतमोजणीला सात तास व रामटेकच्या मतमोजणीला ९ तास लागण्याची शक्यता आहे. या वेळेचा आधार घेतला तर नागपूरची मतमोजणी ३ वाजेपर्यंंत आणि रामटेकची मतमोजणी ५ वाजेपर्यंत संपायला हवी. जिल्हाधिकार्‍यांनी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यास दुपारचे ४ वाजेल असे सांगितले आहे. निकाल जाहीर होण्यासाठी ६ वाजताची वेळ निश्‍चित केली आहे.

मतमोजणीसाठी १४५0 कर्मचार्‍यांनी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना दोन टप्प्यात प्रशिक्षणही देण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेची कसोटी लागणार आहे. पूर्ण क्षमतेने काम केले तरच वेळापत्रक यशस्वी ठरू शकते. २00९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा अनुभव यासंदर्भात बोलका आहे. कामठी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान केंद्र असूनही तेथील मोजणीची प्रक्रिया दुपारपर्यंंतच संपली होती.

मात्र त्यापेक्षा कमी मतदान केंद्र असणार्‍या शहरातील काही विधानसभा मतदारसंघात ही प्रक्रिया सायंकाळपर्यंंत सुरू होती. यावेळीही असे प्रकार होणार नाही असे खात्रीपूर्वक कुणीच सांगायला तयार नाही. कर्मचार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या असल्या तरी त्यांच्याकडून आकडे नोंदविताना चुका होण्याचे प्रकार यापूर्वीच्या निवडणुकीत झाले आहेत. या शिवाय आयोगाने अनेक प्रपत्रात माहिती मागितली आहे.

उमेदवारांच्या प्रतिनिधींनाही माहिती द्यावी लागणार आहे. कर्मचार्‍यांना खानपानासाठीही वेळ द्यावा लागतो. ही संपूर्ण प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे हे कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेवरच अवलंबून आहे. निर्धारित वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (प्रतिनिधी)