शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीवर महानिर्मितीचा भर

By admin | Updated: December 13, 2015 03:00 IST

भारनियमनाच्या गर्तेतून राज्याला बाहेर काढून २४ तास अखंड वीज देण्याच्या ध्यासाने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्यरत आहेत.

अ‍ॅग्रो व्हिजन : महानिर्मितीचा स्टॉल ठरला लक्षवेधी नागपूर : भारनियमनाच्या गर्तेतून राज्याला बाहेर काढून २४ तास अखंड वीज देण्याच्या ध्यासाने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वात महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तिन्ही कंपन्या कार्यप्रवण झाल्या असून महानिर्मितीने राज्याला २४ तास वीज उपलब्ध करून देण्याचा निर्धार केला आहे. हे लक्ष्य गाठतानाच २५०० मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प महानिर्मितीतर्फे उभारण्यात येणार आहे. रेशीमबागच्या अ‍ॅग्रो व्हिजन प्रदर्शनात महानिर्मितीच्या स्टॉल्सवरून ही माहिती नागरिकांना सांगण्यात येत असल्याने हा स्टॉल लक्षवेधी ठरला आहे. सौर ऊर्जा प्रकल्प, एलईडी लाईट्सचा उपयोग, सौर कृषीपंपाच्या माहितीसह येथे माहिती उपलब्ध आहे. राज्य शासनाच्या ऊर्जाविषयक घोरणानुसार एकूण १४ हजार ४०० मेगावॅटपर्यंत वीजनिर्मिती वाढविण्यात येत आहे. सौर ऊर्जेची २५०० मेगावॅट वीजनिर्मितीची जबाबदारी महानिर्मितीवर टाकण्यात आली आहे. यासाठी १५ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असून १२ हजार ५०० एकर जागेत हा प्रकल्प असेल. यासाठी सिंचन प्रकल्पांचे कालवे, कॅनल बँकवर सोलर पॅनल लावून जागेची बचत करण्यात येईल. सध्या महानिर्मिती १८० मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती करते आहे. चंद्रपूर, साक्री, बारामती येथे हे प्रकल्प कार्यान्वित आहेत. यातून पर्यावरण रक्षणाचा प्रयत्न आहे.विद्युत प्रकल्पातून निर्माण होणारी राख उड्डाण पूल, सिमेंट रस्ते आदी उपयोगात आणून राखेचा १०० टक्के उपयोग करण्यात येणार आहे. यासोबतच सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प डिसेंबर अखेर कार्यान्वित होईल. (प्रतिनिधी)