शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

आंतरराष्ट्रीय अभिलेख सप्ताह; कपडे धुण्याच्या दगडातून प्रकटली सम्राट अशोकाची राजाज्ञा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 10:03 IST

Nagpur News नागभीड तालुक्यातील देवटकजवळचे चिंकमारा हे गाव. येथील एका चिंचेच्या झाडाजवळ मोठी पसरट शिळा ठेवली होती. गावातील स्त्रिया कपडे धुण्यासाठी त्याचा वापर करायच्या. त्या शिळेवर वेडीवाकडी अक्षरे होती पण ती कुणाला कळणे शक्य नव्हते.

ठळक मुद्देनाणी, ताम्रपट, शिळांवरील अभिलेखाने जिवंत ठेवला इतिहासमध्यवर्ती संग्रहालयात टिकून आहे वारसाकागदांपूर्वीच्या लिखित दस्तावेजांचे अवशेष

निशांत वानखेडे

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागभीड तालुक्यातील देवटकजवळचे चिंकमारा हे गाव. येथील एका चिंचेच्या झाडाजवळ मोठी पसरट शिळा ठेवली होती. गावातील स्त्रिया कपडे धुण्यासाठी त्याचा वापर करायच्या. त्या शिळेवर वेडीवाकडी अक्षरे होती पण ती कुणाला कळणे शक्य नव्हते. एका व्यक्तीला देव दिसावा तसे त्या अक्षरांमध्ये विशेष असल्याचे समजले. त्याने पुरातत्व विभागाला संपर्क करून माहिती दिली आणि पुढे आला तो इ.स. पूर्व तिसऱ्या शतकातील इतिहास. मौर्य राजवंशात सम्राट अशोकाला स्वामी मानणाऱ्या विदर्भाची राजवट दिलेल्या ‘धर्ममहामात्रा’ने ‘प्राण्यांची हिंसा करू नका, केल्यास शिक्षा होईल’, ही राजाज्ञा तेव्हाच्या चिकुम्बरी या गावी त्या शिळेवर कोरून लावली होती. आता हा शिलालेख नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात आहे.

प्राचीन काळामध्ये भारत देश भाषा, तत्वज्ञान, विज्ञान, कला, स्थापत्यामध्ये प्र्रगत होता. हे ज्ञान मौखिक किंवा लिखित स्वरूपात पुढच्या पिढीपर्यंत हस्तलिखितांच्या माध्यमातून पोहचविण्याचा प्रयत्न झाला. कागदाचा शोध लागेपर्यंत भोजपत्रे, ताडपत्रे (झाडांच्या पानांवर), चर्मपत्रे, ताम्रपट, कापड, लाकूड, दगड (शिळा) किंवा धातूंचा वापर करून संदेश पोहचविला जात होता. या अभिलेखांमुळे प्राचीन काळातील राजवटी, त्यांचा काळ, त्यांची राजाज्ञा आणि तो इतिहास आजही जिवंत राहिला आहे. म्हणूनच शिवरायांची राजमुद्रा आजही अभिमान बाळगायला भाग पाडते. कागदाचा शोध लागण्याआधी प्राचीन काळातील अगदी पहिल्या शतकापासूनचे अनेक ताम्रपट, नाणी, भोजपत्र, शिलालेख मध्यवर्ती संग्रहालयात जतन करून ठेवले आहेत. संग्रहालयाचे सहायक अभिरक्षक व्ही.एन. निट्टूरकर यांनी हा ऐतिहासिक वारसा समजावून सांगितला. मध्य भारतातील प्राचीन काळाचा इतिहास या अभिलेखांमधून सहज अभ्यासता येताे.

- नुकताच चंद्रपूर जिल्ह्यातील गाेजाेली या गावी सापडलेला वाकाटक नरेश पृथ्वीसेन द्वितीय याचा ताम्रपट संग्रहालयात आहे.

- सिरसा, जि. अकाेला येथून सापडलेला इ.स. ९ व्या शतकातील राष्ट्रकुट राजा गाेविंद तृतीय याचा ताम्रपट.

- वाकाटक नरेश प्रवरसेन द्वितीय याचा ५ व्या शतकातील ताम्रपट. बालाघाट, मध्य प्रदेशच्या तिराेडी गावी सापडला हाेता.

- पवनी, जि. भंडारा येथील दुसऱ्या शतकातील क्षत्रप राजवंशातील ‘कुमार रूपीअम्म’चा छायास्तंभ पहावयास मिळताे.

- साेन्याचा मुलामा दिलेला कापडावरील अभिलेख, भाेजपत्रे, ताडपत्रे येथे आहेत.

- सिंधू संस्कृतीतील लेखन कलेचे पुरावे असलेले ताम्रपट, नाणी, दगड किंवा धातूंवरील मुद्रा संग्रहालयात लक्ष वेधून घेतात.

- प्राचीन विविध राजवंशाच्या काळातील नाणी व त्यावर काेरलेले अभिलेख त्या राजवटीचा इतिहास सांगतात.

- १४ व्या शतकातील ग्यासुद्दीन खिलजी याचा पारसी भाषेतील शिलालेख. सुलतान बुराण निजामशाह, मुहमदशहा खिलजी अशा मुस्लिम राजवटींचे शिलालेखही लक्ष वेधून घेतात.

- चेदीवंशी लक्ष्मणराज दुसरा, माळव्याचे परमार राजवट, शिव आराधना करणारा कलचुरी नरेश जयसिंहदेव, यादववंशीय राजा रामचंद्र अशा हिंदू राजांच्या राजवटींचे शिलालेखही उल्लेखनीय आहेत.

आज कागदाचा शाेध लागला तरी काेणतेही अभिलेख डिजिटल पद्धतीने जतन करून ठेवणे गरजेचे असते. मात्र त्या काळातील राजांचे, विद्वानांचे शिलालेख, ताम्रपट, नाणी, भाेजपत्रे आदींच्या माध्यमातून आजही जिवंत आहे. प्राचीन इतिहासाचा उलगडा करणारा हा ऐतिहासिक वारसा आहे.

- जया वाहने, अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय

टॅग्स :historyइतिहास