शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

दीक्षाभूमीवरील सोहळ््याची परदेशी पाहुण्यांनाही भुरळ

By admin | Updated: October 13, 2016 03:50 IST

धम्मच्रक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ््यासाठी देशभरातील लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर गोळा झाले होते.

बाबासाहेबांनी मानवतेसाठी केलेले कार्य मोठेच : व्यक्त केल्या भावनानागपूर : धम्मच्रक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ््यासाठी देशभरातील लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर गोळा झाले होते. मात्र मोठ्या प्रमाणात परदेशी पाहुणेही दीक्षाभूमीवर आले होते. यातील काहींनी पहिल्यांदा येथे भेट दिली होती. बाबासाहेबांबद्दल ऐकून व वाचनातून माहिती होती. मात्र येथे आल्यावर त्यांनी मानवतेसाठी किती अफाट कार्य केले याची प्रचिती आल्याची भावना काही परदेशी पाहुण्यांनी व्यक्त केली.त्रिरत्न बौद्ध संस्था आणि इंटरनॅशनल यूथ कॉन्वेंशनच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर २५ ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणांसाठी कार्य केले जाते. याच माध्यमातून एक अभ्यासदौरा म्हणून बुद्धाचा मार्ग स्वीकारलेल्या काही विदेशी अनुयायांनी यावर्षी पहिल्यांदा नागपूरच्या दीक्षाभूमीला भेट दिली. या समूहाशी लोकमत प्रतिनिधीने संवाद साधला. यातील स्कॉटलँडवरून आलेले सोनिया जेमामन व जेम्स बोलेन यांनी असा ‘अमेझिंग’ सोहळा कधीही न अनुभवल्याची भावना व्यक्त केली. जगात अनेक ठिकाणी वर्ण किंवा वंश भेदावरून एका वर्गाला श्रेष्ठ व एका वर्गाला कनिष्ठ मानून त्या वर्गाच्या मानवाधिकाराचे हनन करण्याचा इतिहास आहे. या भेदभावाविरोधात ज्यांनी लढा दिला ते महान होते. डॉ. आंबेडकर यांनीही भारतात जातीभेदामुळे होणाऱ्या मानवतेविरोधी परिस्थितीशी लढा दिला आणि धम्मक्रांतीने रक्ताचा एक थेंबही न सांडविता परिवर्तन घडविले. येथे आल्यावर त्यांच्या मानवतेच्या महान कार्याची प्रचिती आल्याची भावना जेम्स बोलेन यांनी व्यक्त केली.इंग्लंडहून आलेल्या जोमी क्रॉस व बेथ व्हाईटहाऊस या दीक्षाभूमीवरील गर्दी आणि हा सोहळा पाहून भारावल्या होत्या. इंटरनॅशनल यूथ कन्वेंशनशी वर्षभरापासून जुळलो आहोत आणि यादरम्यान बाबासाहेबांबद्दल बराच अभ्यास केला आहे. मात्र येथे आल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याची महती लक्षात आल्याचे बेथने सांगितले. बाबासाहेब इंग्लंडच्या विद्यापीठात शिकले याचा आम्हाला अभिमान आहे. आता इंग्लंडला गेल्यावर आधी त्या विद्यापीठाला भेट देणार असल्याचे बेथ हिने सांगितले. जर्मनीची स्टिफन मिडनड्रॉफ आणि आॅस्ट्रेलियावरून आलेले रशेल विल्सन व अँजेला वाईली यांनी यानंतरही दीक्षाभूमीवर येण्याची इच्छा व्यक्त केली. निघताना या सर्वांनी ‘जयभीम’ म्हणून निरोप घेतला.