लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखेर महापालिकेने दखल घेत गिट्टीखदान चौकातील अतिक्रमण हटविले. महापालिकेच्या मंगळवारी झोन अंतर्गत अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. त्यामुळे गिट्टीखदान चौकाने अनेक वर्षानंतर मोकळा श्वास घेतला. दरम्यान या कारवाईला काही दुकानदारांनी विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता.गिट्टीखदान चौकाला अतिक्रमणाने विळख्यात घेतले होते. चौकाच्या चारही बाजूंनी फूटपाथवर अतिक्रमण वाढले होते. फूटपाथ विक्रेतेच नव्हे तर ज्यांची पक्की दुकाने आहेत त्यांनी सुद्धा रस्त्यावर अतिक्रमण केले होते. त्यामुळे हा चौक अपघाताच्या दृष्टीने धोकादायक झाला होता. लोकमतने यासंदर्भात २७ आॅक्टोबरच्या अंकात विशेष वृत्त प्रकाशित करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. महापालिकेने याची गंभीर दखल घेत दुपारी कारवाई केली. तत्पूर्वी दुकानदारांना त्यांचे अतिक्रमण स्वत: हटविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. काही दुकानदारांनी स्वत:हून आपले अतिक्रमण काढूनही घेतले होते. परंतु बहुतांश तसेच होते.मनपा धंतोली झोनच्या अधिकाºयांसह अतिक्रमण पथक गिट्टीखदान चौकात पोहोचले तेव्हा काहींनी पथकाला विरोध केला. शाब्दिक वाद झाल्याने तणाव निर्माण झाला होता.परंतु पथकाने आपली कारवाई पूर्ण केली. गिट्टीखदान चौक ते पोलीस ठाणे रोड, गिट्टीखदान बुद्ध विहार, बोरगाव रोड आदी रस्त्याच्या चारही बाजूंनी असलेले फूटपाथ विक्रेते, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, आईसगोला, पाणीपुरी विक्रेते, बिर्याणी, अंडा विक्रेते यांचे अतिक्रमण हटविण्यात आले.कारवाईत सातत्य हवेअतिक्रमण विरोधी कारवाई केली जाते. परंतु कारवाईनंतर अतिक्रमण पुन्हा जैसे थे होते. त्यामुळे मनपाने पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी. सातत्याने कारवाई करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.टिमकी व आकाशवाणी चौकातीलही अतिक्रमण काढलेदरम्यान टिमकी व आकाशवाणी चौकातही अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. डागा हॉस्पिटल जवळील फळ विक्रे्रते, गांजाखेत, गोळीबार चौक परिसरातील अनधिकृत होर्डिंग, टिमकी रोडवर टायर विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. यानंतर आकाशवाणी चौक, हायकोर्ट रोड, हैदराबाद चौक, व्हीसीए चौकापर्यंतचे १० ठेले जप्त करण्यात आले.
गिट्टीखदान चौकातील अतिक्रमणांचा सफाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:43 IST
अखेर महापालिकेने दखल घेत गिट्टीखदान चौकातील अतिक्रमण हटविले. महापालिकेच्या मंगळवारी झोन अंतर्गत अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली.
गिट्टीखदान चौकातील अतिक्रमणांचा सफाया
ठळक मुद्देमनपाने हटविले अतिक्रमण : दुकानदारांच्या विरोधामुळे तणाव