शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सिव्हर लाईन व फूटपाथवरील अतिक्रमणाचा सफाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 00:37 IST

महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी महाल व आसीनगर झोन क्षेत्रातील सिवरलाईन व फूटपाथवरील अतिक्रमणांवर हातोडा चालविला. बडकस चौक ते गांधी पुतळा चौकापर्यंतचा मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यात आला.

ठळक मुद्देप्रवर्तन विभागाची कारवाई : बडकस चौक ते गांधी पुतळा रस्ता अतिक्रमणमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी महाल व आसीनगर झोन क्षेत्रातील सिवरलाईन व फूटपाथवरील अतिक्रमणांवर हातोडा चालविला. बडकस चौक ते गांधी पुतळा चौकापर्यंतचा मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यात आला.आसीनगर झोन क्षेत्रातील मानवनगर, बंगाली आटा चक्की जवळील रहिवासी सतीश साखरे, लीलाबाई चव्हाण, सुधीर चव्हाण व अंबादे आदींनी सिवरलाईनवर अनधिकृ त बांधकाम केले होते. यामुळे सिवरलाईनची दुरुस्ती व देखभाल करताना अडथळा निर्माण झाला होता. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी तक्रार केली होती. अतिक्रमण करणाऱ्यांना झोन कार्यालयातर्फे नोटीस बजाण्यात आली होती. त्यानंतरही अतिक्रमण न हटविल्याने पथकाने कारवाई केली. झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.महाल झोन क्षेत्रातील चिटणवीस पार्क चौक येथील विनोद हरदास यांनी पार्किं गच्या जागेवर दोन दुकानांचे बांधकाम परवानगी न घेता केले होते. यासंदर्भात त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतरही अतिक्रमण न हटविल्याने कारवाई अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. त्यानंतर पथकाने बडकस चौक ते गांधी पुतळा चौकापर्यंतच्या मार्गावरील ७ हातठेले जप्त करून परिसर अतिक्रमणमुक्त केला. ही कारवाई प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील व प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात नितीन मंथनवार, भास्कर मालवे, शादाब खान, विशाल ढोल, रोहीत बेसरे व पथकाने केली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण