- लकडगंज व मंगळवारी झोनमध्ये प्रवर्तन विभागाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने गुरुवारी मंगळवारी व लकडगंज झोन क्षेत्रातील हायटेन्शन लाईनखाली असलेले अतिक्रमण हटविले.
मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत व लकडगंज झोनच्या सहायक आयुक्त शुभांगी मांडगे, प्रवर्तन विभागाचे उपअभियंता अजय पझारे, निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.
मानकापूर येथील रहिवासी सीताराम रामेश्वर शर्मा यांच्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. हायटेन्शन लाईनखाली उभारण्यात आलेले शर्मा याचे झोपडे हटविण्यात आले. तसेच झिंगाबाई टाकळी परिसरातील सीतानगर येथील कुणाल वराडे याचे स्लॅब तोडण्यात आले. फारुख चौकात रस्त्यांच्या दोन्ही बाजूला रस्त्यालगत उभारण्यात आलेले फुल विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले.
लकडगंज क्षेत्रातील कच्ची विसा, स्मॉल फॅक्ट्री एरिया, भंडारा रोड न्यू मोटर स्टँड येथील रहिवाशांनी हायटेन्शन लाईन खाली केलेले अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी सहायक अभियंता भास्कर मालवे, अभियंता महेंद्र सुरडकर, मनोज रंगारी, श्वेता दांडेकर आदी उपस्थित होते.
...
बंद प्रवेशव्दार उघडले
वर्धमाननगर येथील स्थानिक नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने चार प्रवेश व्दाराला कुलूप लावले होते. यामुळे नागरिक त्रस्त होते. मनपाच्या पथकाने चारही गेट खुले केले.