शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उचलेल्या कंत्राटदारांची अंगणवाड्यांना साहित्य पुरवठ्यासाठी धावाधाव; एक कोटीचा गोलमाल

By गणेश हुड | Updated: April 25, 2024 20:13 IST

पुरठ्यापूर्वीच कंत्राटदाराच्या खात्यात बिलाची रक्कम

नागपूर : जिल्ह्यातील अंगणवाड्या अपग्रेड करण्यासाठी साहित्याचा पुरवठा न करताच जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने एक कोटी ६ लाख रुपयांच्या देयकाची रक्कम कंत्राटदाराला अदा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच दोन दिवसापासून कंत्राटदाराची साहित्याचा पुरवठा करण्यासाठी धावाधाव सुरू आहे. बुधवार व गुरुवारी काही अंगणवाड्यांना साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. 

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत स्वमालकीच्या अंगणवाडी केंद्र इमारतीचे श्रेणीवर्धन (अपग्रेड) करण्यासाठी केंद्र शासनाकडून फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषदेला एक कोटी सहा लाख रुपये व पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी ६४ लाखांचा  निधी प्राप्त झाला होता.  यातून अंगणवाड्या अपग्रेड करण्यासाठी स्मार्ट एलएडी टीव्ही, वॉटर क्युरिफायर, कपाट, ग्रीन नेट, हॅन्ड वॉश यासह अन्य साहित्य खरेदी करावयाचे होते. त्यानुसार ४९ अंगणवाड्यांना प्रत्येकी २ लाख रुपयांप्रमाणे हा निधी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात आला. पंचायत समितीस्तरावर साहित्याचा पुरवठा होण्यापूर्वीच कंत्राटदाराला ९८ लाखांचे बील अदा करण्यात आले. या प्रकरणाची तीन सदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी दिले आहे. 

वास्तविक कंत्राटदाराने मागणीप्रमाणे साहित्याचा पुरवठा केला आहे का, याची खात्री झाल्यानंतर पुरवठा झाला असेल त्याच साहित्याची देयके अदा करण्यात यावी असे विभागाचे आदेश आहेत.  उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महिला व बाल विकास समितीला या निधीचा सुगावा लागू न देता कंत्राटदाराला रक्कम अदा केली आहे. हा निधी तालुकास्तरावर रितसर खर्च झाला नसल्याची माहिती महिला व बाल विकास समितीच्या सभापती अवंतिका लेकुरवाळे यांनी दिली. उप आयुक्तांच्या आदेशानुसार निधी वितरित

उप आयुक्त(अंगणवाडी ) एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या आदेशानुसार तालुका स्तरावरील प्रकल्प अधिकाऱ्यांच्या  मागणीनुसार हा निधी त्यांच्या खात्यात वळता करण्यात आला होता. दरम्यान १५ मार्चला माझी बदली झाली. तोपर्यंत कुठलीही तक्रार नव्हती. त्यानंतर काय झाले मला कल्पना नाही.  साहित्याचा पुरवठा झाला की नाही याची खात्री केल्यानंतरच कंत्राटदाला बील अदा करणे अपेक्षीत होते. 

-दामोदर कुंभरे, तत्कालीन  उपमुख्य कार्यकारी अधिकारी