शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

हत्ती रामटेकात धावला नागपुरात मंदावला

By admin | Updated: May 17, 2014 02:00 IST

बसपाच्या हत्तीच्या चालीवर काँग्रेस उमेदवाराच्या विजयाची गणिते ठरत होती. मात्र, या वेळी नागपूर व रामटेक मतदारसंघात भाजप- शिवसेनेने एकतर्फी विजय नोंदविला.

बसपा तिसर्‍या क्रमांकावर : लाखाच्या जवळपास मते

आनंद डेकाटे - नागपूरबसपाच्या हत्तीच्या चालीवर काँग्रेस उमेदवाराच्या विजयाची गणिते ठरत होती. मात्र, या वेळी नागपूर व रामटेक मतदारसंघात भाजप- शिवसेनेने एकतर्फी विजय नोंदविला. त्यामुळे लाखाच्या आसपास मते घेऊनही हत्तीला पाहिजे महत्त्व आले नाही. गेल्यावेळीपेक्षा रामटेकमध्ये हत्ती जोरात धावला. किरण पाटणकर यांना ९५ हजार ५१ मते मिळाली. तर नागपुरात हत्तीची चाल मंदावली. डॉ. मोहन गायकवाड यांना ९६ हजार ४३३ मते मिळाली. जिल्ह्यात बसपाची दोन लाखांची व्होट बँक तयार करण्यात बसपाला या वेळी यश मिळाले. हेच त्यांच्यासाठी या निवडणुकीचे फलित आहे.बसपाने नागपुरात ८.८८ टक्के तर रामटेकमध्ये ९.0४ टक्के मते घेतली. नागपुरात तर ‘आप’च्या नेत्या अंजली दमानिया यांना मागे टाकत तिसर्‍या क्रमांकाचे स्थान निश्‍चित केले. रामटेकमध्येही बसपा तिसर्‍या क्रमांकावर राहिली. त्यामुळे जिल्ह्यात युती, आघाडी नंतर तिसर्‍या पायरीवर आता बसपाचा हत्ती स्थिरावला असल्याचे चित्र आहे. ‘हात’ मिळविला. बसपा स्वतंत्ररित्या लढली. या निवडणुकीत रिपब्लिकन मते बर्‍यापैकी काँग्रेस- रिपाइं सोबत गेल्याने बसपाचा ग्राफ घसरला.गेल्या काही निवडणुकांचा आढावा घेता नागपूर व रामटेक या दोन्ही लोकसभा मतदारसंघात बसपाच्या हत्तीने गती धरल्याचे दिसते. १९९८ चा अपवाद वगळता १९९१ ते २00९ च्या निवडणुकांमध्ये बसपाच्या मतांचा आलेख चढतच गेलेला आहे. बसपाचा हत्ती दिवसेंदिवस धावत असल्याचे चित्र आहे. बसपाचा उमेदवार कोण, यावर दोन्ही मतदारसंघाचे बरेच काही अवलंबून आहे. बसपाने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. येथे नेहमीच वेळेवर व अनपेक्षित उमेदवार देण्याची बसपाची प्रथा राहिली आहे. त्यामुळे या वेळी बसपाच्या हत्तीवर कोण स्वार होतात, याकडे राजकीय वतरुळाचे लक्ष लागले आहे.बसपाने गेल्या निवडणुकांमध्ये मुसंडी घेतली आहे. १९९१ मध्ये नागपुरात सिद्धार्थ पाटील यांना केवळ १२हजार १२७ तर रामटेकमध्ये प्रा. मा.म. देशमुख यांना १२ हजार ३९३ मते मिळाली होती. त्यावेळच्या अपक्ष अपक्ष उमेदवारांच्या तुलनेत ही मते बर्‍यापैकी होती. पुढील निवडणुकीत बसपा जोर मारेल, असे अंदाज बांधले जात असताना १९९६ मध्ये बसपाची रिपाइंसोबत युती झाली. युतीत नागपूर व रामटेक या दोन्ही जागा रिपाइंसाठी सोडण्यात आल्या. विशेष म्हणजे या निवडणुकीत रिपाइंच्या उमेदवारांनी भरभरून मते घेतली. १९९८ मध्ये बसपा पुन्हा स्वबळावर लढली. या निवडणुकीत बसपाची मते दुप्पट झाली. नागपुरातून सिद्धार्थ पाटील यांना २१ हजार ३६२ मते तर रामटेकमधून राम हेडाऊ यांना ३0 हजार ९४९ मते मिळाली. ११९८ च्या यशाने बसपा नेते फार्मात होते. तर दुसरीकडे बसपाचे वाढलेले प्रस्थ रिपाइं नेत्यांनाही खटकणारे होते. याचा परिणाम १९९९ च्या निवडणुकीत दिसून आला. १९९९ मध्ये बसपा व रिपाइं एकमेकांपासून चार हात दूर राहिले. दुसरीकडे रिपाइंने काँग्रेसशी१९९८ च्या तुलनेत बसपाला जवळपास निम्मीच मते मिळाली. नागपुरात प्रा. पी.एस. चंगोले यांना १४ हजार ४६५ तर रामटेकमध्ये अशोक इंगळे यांना १६ हजार ७0६ मतांवर समाधान मानावे लागले. बसपासाठी कमी झालेली मते हा एक मोठा धक्का होता. पुढील पाच वर्षे बसपाचे कॅडर कामी लागले. उमेदवारीचे निकषही बदलले गेले. २00४ मध्ये नागपुरातूव जयंत दळवी तर रामटेकमधून प्रा. चंदनसिंग रोटेले रिंगणात उतरले. दोन्ही मतदारसंघात बसपाच्या उमेदवारांनी पहिल्यांदा ५0 हजार मतांचा पल्ला गाठला. दळवी यांना ५७ हजार २७ व रोटेले यांना ५५ हजार ४४२ मते मिळाली.२00९ च्या निवडणुकीत बसपाने नागपुरात सोशल इंजिनिअररिंगचा प्रयोग केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष व तेली समाजात प्रस्थ असलेले माणिकराव वैद्य यांना उमेदवारी दिली. या वेळी बसपाने पहिल्यांदा १ लाखाचा पल्ला ओलांडला. वैद्य यांना १ लाख १८ हजार ७४१ मते मिळाली व बसपा तिसर्‍या क्रमांकावर पोहचली. रामटेक अनुसूचित जातीसाठी राखीव होते. येथे प्रकाश टेंभूर्णे रिंगणात उतरले. मतदारांना फारसे परिचित नसलेले टेंभूर्णे यांनी चक्क ६२ हजार २३८ मतांवर मजल मारली होती.