शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

वस्त्रोद्योगांना तीन महिन्यात वीजदरात २२५ कोटींची सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:32 IST

महावितरणकडून वस्त्रोद्योग युनिटला वीजदरात एकूण २२५ कोटींची सवलत मिळाली आहे. यामध्ये सर्वाधिक खासगी सूतगिरण्यांना ६१.१४ कोटी आणि सहकारी सूतगिरण्यांना ३७.२६ कोटींची सवलत मिळाली. ही सवलत वर्षाला १२०० कोटींपर्यंत मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देजुलै ते सप्टेंबर : १५ फेब्रुवारी २०१८ ला वस्त्रोद्योग धोरण जाहीर

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी आणि सूताची विक्री देश-विदेशात व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाने वस्त्रोद्योग धोरणात विशेष वीज योजनेचा समावेश करून विविध प्रकारातील वस्त्रोद्योग युनिटला वीजदरात सवलत दिली आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगांना नवसंजीवनी मिळाली असून, यावर्षी जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात महावितरणकडून वस्त्रोद्योग युनिटला वीजदरात एकूण २२५ कोटींची सवलत मिळाली आहे. यामध्ये सर्वाधिक खासगी सूतगिरण्यांना ६१.१४ कोटी आणि सहकारी सूतगिरण्यांना ३७.२६ कोटींची सवलत मिळाली. ही सवलत वर्षाला १२०० कोटींपर्यंत मिळण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने सन २०१८ ते २०२३ या पाच वर्षांसाठी १५ फेब्रुवारी २०१८ ला वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले, तर २१ डिसेंबर २०१८ ला शासन निर्णय घेण्यात आला. त्यानंतर १ जानेवारी २०१९ पासून वीजदरात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रारंभी यंत्रमागाला आणि नंतर वस्त्रोद्योगातील सर्व घटकांचा योजनेत समावेश केला. सहकारी सूतगिरण्यांना मार्चपासून आणि अन्य वस्त्रोद्योग घटकांना जुलैपासून वीजदरात सवलत देण्यात येत आहे. राज्यातील वस्त्रोद्योगातील विविध घटकांना प्रति युनिट २ ते ३.७७ रुपयांपर्यंत सवलत आहे. सवलतीची रक्कम दर महिन्याच्या बिलात नमूद करण्यात येत आहे.योजनेंतर्गत वस्त्रोद्योग विभागाकडे राज्यातील ७४३० वस्त्रोद्योग युनिटने नोंदणी केली असून, त्यापैकी ५५१८ युनिटला वीजदरात सवलत देण्यात येत आहे. अर्जांमध्ये २०९ स्पिनिंग युनिट, ५१५३ पॉवरलूम आणि २०६८ अन्य खासगी युनिट आहेत. वस्त्रोद्योग विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार यंत्रमाग घटकांमध्ये २७ अश्वशक्तीपेक्षा कमी क्षमता असलेल्या ५९३ युनिटला २.७६ कोटी (प्रति युनिट ३.७७ रुपये वीजदरात सवलत), २७ अश्वशक्ती व त्यापेक्षा जास्त परंतु २०१ अश्वशक्तीपेक्षा कमी क्षमता असलेल्या १२२२ युनिटला ३४.८५ कोटी (प्रति युनिट ३.४० रुपये सवलत) तसेच २०१ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ९७ युनिटला १७.८४ कोटी रुपये (प्रति युनिट २ रुपये सवलत) वीजदरात सवलत मिळाली आहे.याशिवाय निटिंग होजियरी व गारमेंट घटकांमध्ये २७ अश्वशक्तीपेक्षा कमी क्षमतेच्या पाच युनिटला १.१९ लाख, २७ अश्वशक्तीपेक्षा जास्त परंतु २०१ अश्वशक्तीपेक्षा कमी क्षमतेच्या २८ युनिटला १६.९२ लाख आणि २०१ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती क्षमतेच्या ३० युनिटला १.५७ कोटी रुपये तसेच प्रक्रिया उद्योग, अन्य सर्व वस्त्रोद्योग घटकांना सवलत देण्यात येत आहे.याशिवाय सहकारी सूतगिरण्यांना सरसकट ३ रुपये आणि १०७ अश्वशक्तीपेक्षा जास्त क्षमतेची सूतगिरणी, प्रक्रिया उद्योग व अन्य सर्व वस्त्रोद्योग घटकांना वीजदरात प्रति युनिट २ रुपये सवलत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांसाठी राज्य शासनातर्फे वीजदरात वेगळी सवलतीची विशेष योजना आहे. पूर्वीच वीजदर कमी आणि वीजदरातील सवलतीमुळे वस्त्रोद्योगांना राज्यात एकप्रकारे नवसंजीवनी मिळाली आहे.सूत्रांनी सांगितले की, नोटाबंदी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सूताच्या दरात प्रचंड घसरण झाल्यानंतर तसेच राज्यात जास्त दरातील सूताला उठाव नसल्यामुळे सहकारी आणि खासगी सूतगिरण्यांना घरघर लागली होती. हा उद्योग वाचविण्यासाठी सूतगिरण्यांच्या संचालकांनी वीजदरात सवलत देण्याचा तगादा राज्य शासनाकडे लावला होता. त्याची दखल घेत राज्य शासनाने वस्त्रोद्योग धोरणात विशेष वीज योजनेचा समावेश करून वीजदरात सवलत देण्याचानिर्णय घेतला.

टॅग्स :Textile Industryवस्त्रोद्योग