शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

राज्य सीमेवरच्या फुलझरी गावात पोहचलीच नाही वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:07 IST

नागपूर : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरचे फुलझरी गाव मागील कितीतरी वर्षापासून श्वापदांचे भय मनात ठेवून जगत आहे. ...

नागपूर : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरचे फुलझरी गाव मागील कितीतरी वर्षापासून श्वापदांचे भय मनात ठेवून जगत आहे. जंगलव्याप्त असलेल्या या गावामध्ये वीज वितरण कंपनीची वीज तर पोहचली नाहीच, पण सौर उर्जेच्या माध्यमातून या गावकऱ्यांना वीज उपलब्ध करून द्यावेसेही अधिकाऱ्यांना वाटले नाही. परिणामत: सायंकाळ झाली की स्वत:ला घरात अंधारात कोंडून घेण्याशिवाय या गावकऱ्यांपुढे अन्य पर्याय उरलेला नाही.

रामटेक तालुक्यातील फुलझरी हे गाव तालुका मुख्यालयापासून ३६ किलोमीटर अंतारावर आहे. १०० टक्के आदिवासीबहुल असलेल्या सुमारे ३०० लोकवस्तीच्या या गावामध्ये ४० ते ५० घरे आहेत. पेंच प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या या गावात पोहचण्यासाठी धड रस्ताही नाही. वनव्याप्त गाव असल्याने कसल्याही सुविधा गावात पोहचल्या नाहीत. नागरी सुविधांपासून वंचित असलेल्या या गावात वन कायद्याचा अडसर आल्याने कसल्याही सुविधा नाहीत. सायंकाळ झाली की श्वापदे गावात येतात. कधी धोका होईल सांगता येत नाही. त्यामुळे गावकरी अक्षरश: स्वत:ला रात्रभर घरात कोंडून घेतात.

या गावच्या समस्या संदर्भात मनसेचे रामटेक तालुका अध्यक्ष शेखर दुडे म्हणाले, या गावकऱ्यांकडे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड आहे. मतदानाला नेतेमंडळी गावात पोहचतात, मात्र सुविधांकडे लक्ष कुणाचेच नाही. वीज वितरण कंपनीकडे बरेचदा गावकऱ्यांसह निवेदने दिली. मात्र हा प्रश्न वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पोहचलाच नाही. परिणामत: बफर झोनमधील अन्य गावात वीज पोहचूनही हे गाव मात्र वीज कंपनीच्या यादीवर आलेच नाही. दोन दिवसांपूर्वी दुडे यांच्या पुढाकारात गावकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंत्यांकडे पुन्हा निवेदन देऊन गावात किमान सौर ऊर्जेवरील प्रकाशाची तरी व्यवस्था करा, अशी मागणी करणारे निवेदन दिले आहे.

...

वन विभागाला करायचे आहे पुनर्वसन

हे गाव पेंचच्या बफर झोनमध्ये येत असल्याने वन विभागाला या गावाचे पुनर्वसन करायचे आहे. मात्र गावकऱ्यांचा याला विरोध आहे. गावालगत आपली शेती आहे. वन विभाग फक्त १० लाख रुपयांची नुकसान भरपाई देऊ पहात आहेत. त्यामुळे गाव सोडून जाण्यास गावकऱ्यांचा नकार आहे. या संघर्षात हे गावकरी सुविधांपासून दूर राहिले आहेत.

...