शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळून दोघांचा मृत्यू

By admin | Updated: June 17, 2017 02:18 IST

जोरात कडाडलेली वीज झाडावर कोसळल्याने झाडाखाली उभ्या असलेल्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला

एक जखमी : गुमथळा, गोंडखैरी शिवारातील घटना लोकमत न्यूज नेटवर्क गुमथळा/कळमेश्वर : जोरात कडाडलेली वीज झाडावर कोसळल्याने झाडाखाली उभ्या असलेल्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला. या घटना कामठी तालुक्यातील गुमथळा आणि कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी शिवारात अनुक्रमे गुरुवारी व शुक्रवारी दुपारी घडल्या. पहिली घटना गुमथळा शिवारात गुरुवारी सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास घडली. विनोद अजाब कोकाटे (३५, रा. बोरी-राणी, ता. पारशिवनी) यांनी गुमथळा शिवारातील त्यांचे सासरे नागोराव खेडकर, रा. गुमथळा व अन्य दोन शेतकऱ्यांची शेती ठेक्याने केली आहे. त्यामुळे ते गुरुवारी दुपारी शेताची ट्रॅक्टरने नांगरणी करीत होते. दरम्यान, सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे विनोद आणि नत्थूजी ठाकरे हे दोघेही शेतातील कडूनिंबाच्या झाडाच्या आडोशाला थांबले. त्यातच विनोदचा भाऊ अमोल कोकाटे व रूपचंद बोरकुटे दोघेही ट्रॅक्टर शेताच्या बाहेर नेत होते. त्यातच जोरात कडाडलेली वीज थेट झाडावर कोसळली. त्यात विनोद व नत्थूजी ठाकरे गंभीर जखमी झाले. अमोल आणि रूपचंद या दोघांनीही विनोद व नत्थूला लगेच गुमथळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तिथे डॉक्टरांनी विनोदला मृत घोषित केले तर नत्थूवर प्रथमोपचार करून मेयो रुग्णालयात रवाना केले. दुसरी घटना कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी शिवारात शुक्रवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. धनराज नामदेव टापरे (४५, रा. गोंडखैरी, ता. कळमेश्वर) हे अरुण रंगराव अतकरी, रा. गोंडखैरी यांच्या शेतात कामाला गेले होते. दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्याने ते शेतात झाडाचा आडोसा शोधत होते. त्यातच जोरात कडाडलेली वीज थेट त्यांच्या अंगावर कोसळल्याने त्यांचा व सोबतच्या कुत्र्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मौदा व कळमेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.