शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

फिक्स चार्ज वाढविणार विजेचे बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 10:26 IST

राज्य वीज नियामक आयोगाने गुरुवारी वीजदरात ६ ते ८ टक्के वाढ करण्याची परवानगी वीज वितरण कंपनी महावितरणला दिली आहे. नवीन दर १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

ठळक मुद्देवर्षभरात तीन दर १ एप्रिलला पुन्हा होणार दरवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य वीज नियामक आयोगाने गुरुवारी वीजदरात ६ ते ८ टक्के वाढ करण्याची परवानगी वीज वितरण कंपनी महावितरणला दिली आहे. नवीन दर १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. ग्राहक वीज बिलात ६ ते ८ टक्के वाढीचे आकलन करीत असेल तर ते चुकीचे आहे. कारण फिक्स चार्ज वाढल्यानंतर दरवाढ आणखी जास्त होणार आहे.वीज ग्राहकांनी संपूर्ण महिना विजेचा उपयोग केला नसला तरीही त्यांना फिक्स चार्ज द्यावाच लागतो. यावेळी त्यात मागील दाराने दरवाढ केली आहे. १ सप्टेंबरपासून लागू होणारे दर यावर्षात तिसऱ्यांदा वाढवून त्याची अंमलबजावणीही केली आहे.पहिले दर मार्च-२०१८ पर्यंत लागू झाले. दुसरे एप्रिल ते ३१ आॅगस्टपर्यंत आणि आता तिसऱ्यांदा १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. प्रत्येक दरवाढीसोबत फिक्स चार्जही वाढविले आहेत.घरगुती वीज ग्राहकांची गोष्ट केली तर मार्च-२०१८ पर्यंत त्यांना सिंगल फेज कनेक्शनसाठी ६५ रुपये द्यावे लागत होते. एप्रिलपासून हे दर ७० रुपये करण्यात आले. आता १ सप्टेंबरपासून हे दर ८० रुपयांवर गेले आहेत. तर १ एप्रिल-२०१९ पासून हे दर ९० रुपयांवर जाणार आहेत.पूर्वी फिक्स चार्जचा विचार केल्यास वर्ष-२०१४ मध्ये हे दर केवळ ४० रुपये होते. अर्थात वर्ष-२०१४ च्या तुलनेत आता १०० टक्के दरवाढ झाली आहे.थ्री फेज घरगुती ग्राहकांनाही याच प्रकारचा फटका बसला आहे. मार्च-२०१८ मध्ये हे दर १७० रुपये होते. ते एप्रिलमध्ये वाढवून १८५ रुपयांवर नेण्यात आले. त्यात आणखी वाढ होऊन १ सप्टेंबरला ३०० रुपयांपर्यंत वाढविले आहेत. एप्रिल-२०१९ मध्ये वाढून ते ३२० रुपयांवर जाणार आहेत. याचप्रकारे घरगुती वीजदरही वाढले आहेत.आता १०० युनिटपर्यंत आकारण्यात येणाऱ्या प्रति युनिट ५.०७ रुपयांऐवजी ५.३१ रुपये, १०१ ते ३०० युनिटसाठी ८.८४ रुपयांऐवजी ८.९५ रुपये ग्राहकांना द्यावे लागेल. वाणिज्यक वीज ग्राहकांनाही फिक्स चार्ज द्यावे लागेल.आता २९० रुपयांऐवजी ३२० रुपये आकारण्यात येणार आहे. ते एप्रिल-२०१९ पासून पुन्हा वाढणार आहे.

शेतकऱ्यांना दरवाढीचा फटकानियामक आयोगाने कृषी ग्राहकांसाठी फिक्स चार्जमध्ये वाढ केली आहे. आता शेतकऱ्यांना २४ रुपयांऐवजी ३५ रुपये द्यावे लागतील. यासह विजेचे प्रति युनिट दर ३.०४ रुपयांऐवजी ३.२३ रुपये द्यावे लागेल.

टॅग्स :electricityवीज