शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

खासदार रामदास तडस व प्रतापराव जाधव यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिका खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:10 IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी भारतीय जनता पक्षाचे खासदार रामदास तडस व शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी भारतीय जनता पक्षाचे खासदार रामदास तडस व शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिका गुणवत्ताहीन ठरवून खारीज केल्या. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला.

तडस हे वर्धा तर, जाधव हे बुलडाणा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीला अनुक्रमे धनराज वंजारी व बळीराम शिरसकर यांनी आव्हान दिले होते. दोन्ही याचिकाकर्ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. तडस व जाधव यांनी या याचिका प्राथमिक टप्प्यावरच खारीज करण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डरमधील नियम ११(ए)अंतर्गत अर्ज दाखल केले होते. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ८३(१-ए)अनुसार निवडणूक याचिकेमध्ये तथ्यासंदर्भात मुद्देसूद माहिती असणे आवश्यक आहे. तसेच, कलम १००(१-बी) अनुसार निवडणूक अवैध ठरविण्यासाठी निर्वाचित उमेदवाराने भ्रष्ट मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे. परंतु, या याचिका यासह अन्य संबंधित कलमातील तरतुदींची पूर्तता करीत नाही, असे तडस व जाधव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाला त्यात तथ्य आढळून आल्यामुळे हे अर्ज मंजूर करून निवडणूक याचिका फेटाळण्यात आल्या. तडस यांच्यातर्फे ॲड. फिरदोस मिर्झा व ॲड. आनंद देशपांडे, जाधव यांच्यातर्फे ॲड. नीलेश काळवाघे, याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. निहालसिंग राठोड तर, निवडणूक आयोगातर्फे ॲड. नीरजा चौबे यांनी कामकाज पाहिले.

-----------------

असे होते याचिकाकर्त्यांचे म्हणणे

निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरण्यात आल्या. त्यामुळे झालेले मतदान व मोजण्यात आलेले मतदान यात फरक आढळून आला. त्याचा फायदा विजयी उमेदवारांना मिळाला. तसेच, दोन्ही मतदार संघातील निवडणूक अधिकाऱ्यांनी कायदेशीर तरतुदी व नियमांचे काटेकोर पालन केले नाही. त्यामुळे दोन्ही मतदारसंघातील निवडणूक रद्द करून नव्याने निवडणूक घेण्यात यावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.

--------------

नितीन गडकरी यांच्या समर्थनातील निर्णयाचा आधार

उच्च न्यायालयाने हा निर्णय देताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या समर्थनातील निर्णयाचा आधार घेतला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सागर डबरासे यांनी समान मुद्यांच्या आधारावर गडकरी यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली होती. ती याचिका फेटाळण्यात आली होती. तडस व जाधव यांनी या निर्णयाची माहिती न्यायालयाला दिली.