शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नांद मध्ये पोटनिवडणुकीची नांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:12 IST

भिवापूर: ओबीसी आरक्षणावरून जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या रिक्त झालेल्या जागांवर गतवेळी जाहीर झालेली पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर निवडणूक ...

भिवापूर: ओबीसी आरक्षणावरून जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या रिक्त झालेल्या जागांवर गतवेळी जाहीर झालेली पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर निवडणूक आयोगाने सोमवारी पुन्हा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तालुक्यात पंचायत समितीच्या केवळ नांद गणात ही पोटनिवडणूक होणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून नांद गणाच्या पंचायत समिती सदस्या नंदा नारनवरे यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. याच जागेसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली होती. नारनवरे तीन वेळा जिल्हा परिषद सदस्या तर दोन वेळा पंचायत समिती सदस्या राहिल्या आहेत. गत सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे त्या अपक्ष लढल्या होत्या. यात काँग्रेस, भाजप, सेनेला चारही मुंड्या चित करत त्यांनी विजयश्री मिळविला होती. मात्र सदस्यत्व रद्द झाल्यानंतर जाहीर झालेली पोटनिवडणूक लढण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली होती. त्यामुळे नांद गणाकरिता माधुरी संजय देशमुख (काँग्रेस), शोभा मोरेश्वर चुटे (भाजप), वनिता संतोष घरत (शिवसेना), सुनिता अशोक वाघ (वंचित) या चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यानंतर ही पोटनिवडणूक रद्द झाली. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आता पुन्हा याच जागांवर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आचारसंहिताही लागली आहे. गत पोटनिवडणुकीकरिता दाखल केलेल्या उमेदवारांचे अर्ज कायम राहणार आहे. ही पोटनिवडणूक असली तरी गृहतालुक्यातील एकमेव जागा काबीज करण्यासाठी आ. राजू पारवे कोणते कौशल्य दाखवितात याकडे सर्वांच्या नजरा असणार आहे. भाजपच्या हातून गेलेली जागा पुन्हा परत मिळविण्यासाठी माजी आ. सुधीर पारवे दंड थोपटणार आहे.