शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

चार सदस्यीय पद्धतीनेच निवडणूक

By admin | Updated: June 24, 2016 03:10 IST

राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्यावर स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नकार दिला.

हायकोर्टाचा स्थगितीस नकार : आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाची याचिका नागपूर : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्यावर स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नकार दिला. या पद्धतीविरुद्ध आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाने महासचिव विद्या भिमटे यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. राज्य शासनाने यासंदर्भात १९ मे २०१६ रोजी अध्यादेश जारी केला आहे. हा अध्यादेश असंवैधानिक आहे असा दावा करून त्यावर स्थगिती देण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती. न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यामुळे ही विनंती मान्य करण्यास नकार दिला. परंतु, राज्य शासनाचे मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे सचिव, राज्य निवडणूक आयोग, भारतीय निवडणूक आयोग व केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालय यांना नोटीस बजावून १४ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.याचिकाकर्त्यांनी स्वत:ची बाजू स्पष्ट करण्यासाठी न्यायालयासमक्ष विविध मुद्दे मांडले आहेत. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेणे लहान पक्षांसाठी अन्यायकारक आहे. ही पद्धत केवळ मोठ्या पक्षांसाठी फायद्याची आहे. मोठे पक्ष आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. यामुळे ते चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीचा खर्च सहन करू शकतात. लहान पक्षांना व अपक्ष गरीब उमेदवारांना हे शक्य होणार नाही. परिणामी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय रद्द करणे आवश्यक आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.निवडणुकीत इव्हीएम वापरण्यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. इव्हीएम वापरायची असल्यास सर्वोच्च न्यायालयाने ८ आॅक्टोबर २०१३ रोजी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात यावे. या आदेशानुसार इव्हीएममध्ये पेपर ट्रेल (व्ही कार्ड) लावणे आवश्यक आहे. यामुळे निवडणूक पारदर्शक होते, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. राजकीय पक्षांना निवडणूक लढण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. यामुळे निवडणूक जिंकणारे उमेदवार भ्रष्टाचार करणार नाहीत. महानगरपालिका व नगर परिषद निवडणुकीत एका उमेदवाराने किती खर्च करावा याची मर्यादा ठरवून देण्यात यावी. नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुका अध्यक्षीय पद्धतीने होणार आहेत. या पद्धतीत अध्यक्षपदासाठी उमेदवार उभे राहतील व नागरिकांना अध्यक्ष निवडून द्यावा लागेल. ही पद्धत अवैध आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. नितीन सोनारे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)