शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएमवर होणार राज्यातील विद्यार्थी संघाच्या निवडणुका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:39 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठासह राज्यातील सर्वच विद्यापीठात होणाऱ्या महाविद्यालयीन व विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन(ईव्हीएम)द्वारे होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देराज्यपालांच्या अप्पर सचिवांचे (शिक्षण) विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठासह राज्यातील सर्वच विद्यापीठात होणाऱ्या महाविद्यालयीन व विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन(ईव्हीएम)द्वारे होण्याची शक्यता आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे अप्पर सचिव (शिक्षण) पी.पी. लुबल यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्यासह राज्यभरातील विद्यापीठाच्या कुलुगुरूंना यासंदर्भातील पत्र पाठविले आहे. त्यांनी विद्यापीठाच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्यास सांगितले आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या निवडणूक नियमावलीमध्ये प्रावधान करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे.लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, यामागे युवकांमध्ये ईव्हीएम मशीन व मतदानाप्रति जनजागृती करण्याचा उद्देश आहे. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी व ईव्हीएमबाबत युवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत शहरासोबतच ग्रामीण भागावर जास्त जोर देण्यात येत आहे. विद्यार्थी संघाच्या निवडणुका या अभियानासाठी उपयुक्त माध्यम मानण्यात येत आहे. त्यासाठी हे आदेश देण्यात आले आहे. सूत्रांच्या मते, विद्यार्थी संघाच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्याची मागणी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेत राज्यपालाचे माजी प्रतिनिधी डॉ. संजय खडक्कार यांनी केली होती. यासंदर्भात त्यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना पत्रही लिहिले होते. त्यांच्या पत्राची राज्यपालांनी दखल घेऊन विद्यापीठांना निर्देश दिले आहे.विशेष म्हणजे राज्यात २५ वर्षानंतर २०१९-२० या शैक्षणिक सत्रात विद्यार्थी संघाच्या खुल्या निवडणुका होत आहेत. यापूर्वी महाविद्यालय व विद्यापीठात निवड प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्यात येत होती.विद्यार्थी संघटनांची मागणी लक्षात घेता, गेल्या वर्षी विद्यापीठासाठी बनलेल्या महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अ‍ॅक्ट २०१६ मध्ये खुल्या निवडणुकीचे प्रावधान करण्यात आले आहे.

पहिले राज्य बनेलमहाविद्यालय व विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत जर ईव्हीएमचा वापर झाल्यास महाराष्ट्र देशातील पहिले राज्य बनेल. आतापर्यंत देशाच्या कुठल्याही विद्यापीठ व महाविद्यालयात विद्यार्थी संघाच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्यात आला नाही.

जनजागृतीसाठी गरजेचेयासंदर्भात डॉ. खडक्कार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पुष्टी केली की, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना मी पत्र लिहिले होते. राजभवनातून त्यांना पत्राची प्रत पाठविण्यात आली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक