शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

रोजगाराच्या संधीकरिता उद्योगवाढीसाठी प्रयत्न

By admin | Updated: May 30, 2016 02:25 IST

राज्यात जोपर्यंत उद्योग धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही तोपर्यंत रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार नाहीत.

उद्योग राज्यमंत्री पोटे : उद्योग भवन कार्यशाळा नागपूर : राज्यात जोपर्यंत उद्योग धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही तोपर्यंत रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार नाहीत. उद्योगवाढीसाठी उद्योजक व कामगारांचे हित जोपासून नवीन कायदा लवकरात लवकर तयार करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज केले.उद्योग भवनाच्या सभागृहात आज विदर्भ इंड्रस्ट्रीज असोसिएशन, एमआयडीसी इंड्रस्ट्रीज असोसिएशन व बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनतर्फे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रवीण पोटे यांनी उद्योजकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर विदर्भ इंडस्ट्रीजचे अतुल पांडे, बीएमआयचे नितीन लोणकर, मिलिंद कानडे, एमआयएचे कॅप्टन सी.एन. रणधीर, एस.आर. वाघ, सुजाता कडू उपस्थित होते. उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यावेळी म्हणाले की, देशांतर्गत उत्पादनास चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया अभियानांतर्गत देशी-विदेशी गुंतवणुकीद्वारे औद्योगिक विकास व रोजगार निर्मितीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मेक इन इंडिया वीक आयोजित करून राज्यात सुमारे आठ लक्ष कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. त्याचबरोबर नागपूर व अमरावती विभागात उत्पादन क्षेत्रातील ४,४०० कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. जे काम ६६ वर्षांत झाले नाही ते काम राज्य शासनाने गेल्या दीड वर्षांत केले आहे. राज्यात उद्योजकांनी चांगल्या पद्धतीने उद्योग केला पाहिजे यासाठी उद्योजक व कामगार यांनी एकमेकांच्या हिताची जोपासना करून आपल्या राज्याचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उद्योग सहसंचालक अ.प्र. धर्माधिकारी, अनिता मेश्राम, मुख्य अभियंता एस.आर. वाघ, प्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे, अतिरिक्त कामगार आयुक्त आर.एस. जाधव, अतिरिक्त संचालक जे.एम. मोटघरे, सहसंचालक एन.एस. अधारी, उपनियंत्रक रामअनुज, नासुप्रचे मुख्य अभियंता एस.एच. गुज्जेलवार, महावितरणचे मुख्य अभियंता प्रसाद रेशमे या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले.(प्रतिनिधी) अमरावती एमआयडीसीला उद्योगाचे मॉडेल बनवणारअमरावती एमआयडीसी हे राज्यात उद्योगाचे मॉडेल बनावे, यासाठी आपला प्रयत्न आहे. यासाठी मोठमोठे उद्योग आणण्यासाठी उद्योजकांचे मत परिवर्तन करून त्यांना कुशल कामगारवर्ग उपलब्ध करून देऊ, असेही उद्योग राज्यमंत्री पोटे यांनी यावेळी सांगितले.