शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

करटी केंद्रात शैक्षणिक साहित्य निर्मिती

By admin | Updated: January 31, 2017 03:21 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत नवोपक्रमशिल केंद्रप्रमुख आर.बी. घोष यांच्या मार्गदर्शनाखाली समूह

नवोपक्रमांवर भर : विद्यार्थी जलद गतीने होणार प्रगत परसवाडा : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत नवोपक्रमशिल केंद्रप्रमुख आर.बी. घोष यांच्या मार्गदर्शनाखाली समूह साधन केंद्र करटी (बु.), पं.स. तिरोडा येथे शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रगतशिल विद्यार्थी जलद गतीने प्रगत होण्यासाठी आर.बी. घोष यांनी आपल्या केंद्रांतर्गत शिक्षकांची साहित्य निर्मिती कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेला केंद्रातील एन.यू. रहांगडाले, पी.डी. देशमुख, जी. आर. पटले, एल.एम. बारापात्रे, डी.ए. बिसेन, जे.के. डोंगरे, सुजाता चव्हाण, शारदा पारधी व दिलीप हिरापुरे यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला. निकष कार्ड पेटी, शब्द चक्र, वाक्यचक्र, बॉल गेम, दिवस व महिने रचनावादी चार्ट इत्यादी साहित्याची निर्मिती कार्यशाळेत करण्यात आली. केंद्रांतर्गत सर्व वर्गामध्ये मिळालेल्या अनुदानातून शिक्षक साहित्य निर्मिती करुन अध्यापन करतील. कार्यशाळेत तयार केलेल्या साहित्यामुळे दोन हजार वाक्य तयार करणे, वाक्य रचना करणे, इंग्रजी वाक्य तयार क रणे, गणितीय प्राथमिक क्रिया करणे, अल्फाबेट मधील लहाना मोठेपणा ओळखणे, प्रगत व प्रगतशील विद्यार्थी करु शकतील असे केंद्रप्रमुख आर.बी. घोष यांनी सांगितले. शासनाकडून शैक्षणिक सत्र २०१६-१७ साहित्य निर्मितीकरिता प्रतिशिक्षक ५०० रुपये शाळेला मिळालेले आहेत. त्यादृष्टीकोणातून शिक्षकांनी स्वयंनिर्मित साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने व प्रगतशिल विद्यार्थी जलद गतीने प्रगत होण्यास्तव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत उपस्थित शिक्षक आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांना शैक्षणिक साहित्य तयार करण्यास्तव मदत करतील, असे केंद्रप्रमुख आर.बी. घोष यांनी सांगितले. (वार्ताहर)