शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण उपसंचालकांचे संकेतस्थळ ‘आऊटडेटेड’

By admin | Updated: January 5, 2015 00:52 IST

विभागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक तसेच प्रशासकीय बाबींसंदर्भात महत्त्वाचा दुवा असलेल्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे संकेतस्थळच ‘अपडेट’ नसल्याची बाब समोर आली आहे.

अद्यापही जुुन्या अधिकाऱ्यांचीच नावे : महत्त्वाची माहिती उपलब्ध नाहीयोगेश पांडे - नागपूर विभागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक तसेच प्रशासकीय बाबींसंदर्भात महत्त्वाचा दुवा असलेल्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे संकेतस्थळच ‘अपडेट’ नसल्याची बाब समोर आली आहे. अचूक माहिती द्या असे शाळांना निर्देश देणाऱ्या या कार्यालयाकडूनच जगाला ई चावडीवर ‘आऊटडेटेड’ माहिती देण्यात येत असल्याचा विरोधाभास पाहायला मिळत आहे. कार्यालयाच्या संकेतस्थळावर विभागातील शिक्षणाशी संबंधित कुठलीच सखोल माहितीच उपलब्ध नाही. आश्चर्याची बाब म्हणजे अजूनही या संकेतस्थळावर विद्यमान उपसंचालक अनिल पारधी यांचे कुठेही नावच नाही.प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावरील शैक्षणिक व प्रशासकीय बाबींसंदर्भात विभागीय प्रमुख म्हणून विभागीय उपसंचालक हे काम पाहतात. विभागीय कार्यालय, दुय्यम कार्यालये तसेच शिक्षण संस्था यांच्यात माहितीचे आदानप्रदान सुलभ व वेगवान व्हावे, तसेच कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता व सुसूत्रता यावी यासाठी शासनाच्या माहिती तंत्रज्ञानविषयक धोरणास अनुसरून ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.डीवायडीईनागपूर.ओआरजी’ हे संकेतस्थळ तयार करण्यात आले. याद्वारे मनुष्यबळ, वेळ, इंधन व पैसा यांची मोठ्या प्रमाणावर बचत होईल, अशी अपेक्षा होती.परंतु नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे संकेतस्थळ अजिबात ‘अ‍ॅक्टिव्ह’ नसल्याचे दिसून येते. शासन आणि संचालनालयातर्फे घेतले जाणारे निर्णय, परिपत्रके, योजना, माहिती यापैकी काहीच या संकेस्थळावर उपलब्ध नाही. केवळ अकरावी प्रवेशाची यादी व इतर माहिती या संकेतस्थळावर दरवर्षी अचूकपणे ‘अपलोड’ होते.पारधी नव्हे करजगावकरांचेच नावअनिल पारधी हे विभागीय शिक्षण उपसंचालक आहेत. परंतु अजूनही संकेतस्थळावर माजी उपसंचालक महेश करजगावकर यांचेच नाव दिसून येत आहे. शिवाय मागील वर्षी निवृत्त झालेले पी.पी. निकास हेच अद्यापही संकेतस्थळावर सहायक संचालक आहेत.तत्काळ ‘अपडेट’ करणारयासंबंधात विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले. ही बाब गंभीर असून हे संकेतस्थळ तातडीने ‘अपडेट’ करण्यात येईल, असे ते म्हणाले.पुणे, कोल्हापूर आघाडीवरई-तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करून घेण्यात राज्यामध्ये पुणे, कोल्हापूर विभागीय उपसंचालक कार्यालयांनी बाजी मारली आहे. दुय्यम कार्यालये, संलग्न शिक्षण संस्था यांना संकेतस्थळाच्या माध्यमातून माहितीचे थेट आदानप्रदान होते. शासन निर्णय, परिपत्रके संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतात