शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रिझर्व्ह बँकेकडून अशोक धवड यांच्या नवोदय बँकेचा आर्थिक परवाना रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:49 IST

आर्थिक गैरव्यवहारामुळे पूर्वी प्रशासकाची नेमणूक केलेल्या नवोदय बँकेचा आर्थिक परवाना रिझर्व्ह बँकेने आता रद्द केला आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या कोट्यवधींच्या ठेवी संकटात आल्या आहेत. माजी आमदार अशोक धवड यांच्यातर्फे बँकेचे संचालन करण्यात येत होते.

ठळक मुद्देआर्थिक गैरव्यवहार कारण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिक गैरव्यवहारामुळे पूर्वी प्रशासकाची नेमणूक केलेल्या नवोदय बँकेचा आर्थिक परवाना रिझर्व्ह बँकेने आता रद्द केला आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या कोट्यवधींच्या ठेवी संकटात आल्या आहेत. माजी आमदार अशोक धवड यांच्यातर्फे बँकेचे संचालन करण्यात येत होते.यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने ४ आॅक्टोबर रोजी आदेश जारी केला आहे. तो आदेश नवोदय बँकेचे प्रशासक व जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांना ८ आॅक्टोबर रोजी प्राप्त झाला. पूर्वी प्रशासकाची नेमणूक केल्यानंतर बँकिंग व्यवहार सुरू होते. पण आता तेही बंद झाले आहेत. त्यामुळे सहकार आयुक्तांना बँक अवसायानात काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रिझर्व्ह बँकेने नवोदय बँकेचे बँकिंग व्यवहार बंद करून ही बँक अवसायानात काढण्यासाठी अवसायकाची नियुक्ती करण्याची विनंती सहकार आयुक्तांना केली आहे. यापूर्वी आॅडिटर श्रीकांत सुपे यांनी बँकेतील आर्थिक अनियमिततेवर ठपका ठेवून सर्व पदाधिकारी आणि संचालकांवर फौजदारी खटला दाखल करण्याची शिफारस केली होती.नवोदय बँकेकडे आवश्यक भांडवल नाही व कमाईचे प्रभावी मार्गही नाहीत. त्यामुळे बँकिंग रेग्युलेशन कायदा-१९४९ मधील कलम ११ (१), २२(३)(डी) व ५६ मधील तरतुदींचे उल्लंघन झाले आहे. तसेच, ही बँक कलम २२(३)(ए), २२(३)(बी), २२(३)(डी) व २२(३)(ई) मधील तरतुदींचे पालन करण्यात अपयशी ठरली आहे. सध्याच्या आर्थिक स्थितीत ही बँक ठेविदारांना आवश्यक रक्कम अदा करण्यास असक्षम आहे. अशा परिस्थितीत ही बँक सुरू ठेवणे ठेविदारांच्या हिताला धोकादायक ठरेल. परिणामी या बँकेला बँकिंग व्यवहार करण्यापासून थांबविण्यात येत आहे. यापुढे या बँकेचे बँकिंगमध्ये मोडणारे सर्व व्यवहार थांबविण्यात यावे. अवसायनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बँकेचा प्रत्येक ठेविदार ‘डीआयसीजीसी’कडून एक लाख रुपये परत मिळण्यास पात्र आहे असे रिझर्व्ह बँकेच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :bankबँकAshok Dhavadअशोक धवड