शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

पाणीपुरी खाताय, एकदा विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 12:11 IST

Nagpur News बाहेरचे खाद्य पदार्थ खाण्यापूर्वी विशेषत: पाणीपुरी खातांना एकदा विचार करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

ठळक मुद्देटायफाईड वाढला लहान मुलांसोबतच मोठेही आजारी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘टायफाईड’ म्हणजे विषमज्वराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. १०० रुग्णांमध्ये जवळपास १० रुग्ण या आजाराचे आढळून येत आहे. दूषित भोजन किंवा दूषित पाणी पिल्याने हा आजार होतो. यामुळे बाहेरचे खाद्य पदार्थ खाण्यापूर्वी विशेषत: पाणीपुरी खातांना एकदा विचार करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच पुन्हा एकदा चौकाचौकात विविध खाद्य पदार्थांचे हातठेले उभे राहू लागले आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत बाहेरचे चटपटीत खाण्यावर अनेकांचा जोर असतो. परंतु या दिवसांत तापमानातील घट, शरीरातील कमी होणारी उष्णता, त्याचवेळी या नव्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा शरीराचा प्रयत्न, या बदलांतून अनेक प्रकारचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. सध्या दूषित अन्न व पाण्यामुळे होणारा ‘टायफाईड’ आढळून येत आहे. नागपुरात पाणीपुरीतून हा आजार बळावत असल्याचे समोर आले आहे. पाणीपुरीतील पाणी हे उखळलेले नसते. दुसरे म्हणजे, पाणीपुरीवाला वारंवार हात त्यात बुचकळत असतो. त्याच्या हाताची व नखातील घाण त्यात मिसळत असते. डॉक्टरांकडे आलेल्या टायफाईडच्या काही रुग्णांनी आजारापूर्वी पाणीपुरी खाल्ल्याचेही पुढे आले आहे.

-आजाराची लक्षणे

डॉक्टरांनुसार, ‘साल्मोनेला टायफी’ नावाचा हा विषाणू मानवी शरीरात पसरतो. या रोगाच्या पहिल्या आठवड्यात शरीराचे तापमान हळूहळू वाढते. सोबतच डोकेदुखी, अंगदुखी आणि अस्वस्थता वाटते. काहींना उलट्यांचाही त्रास होतो. डॉक्टरांनुसार, या आजाराचे निदान करताना रक्ताची चाचणी म्हणजे ‘विडाल टेस्ट’ पहिल्या आठवड्यात ‘निगेटिव्ह’ येते. परंतु रोगाच्या दुसऱ्या आठवड्यात ताप वाढतो आणि १०४ डिग्री पर्यंत पोहचतो. रुग्ण बेशुद्ध अवस्थेतही जाऊ शकतो. हगवण लागण्याचा त्रासही होऊ शकतो. याच टप्प्यात करण्यात येणाऱ्या ‘विडाल टेस्ट’मध्ये रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ येतो. रोगाच्या तिसऱ्या आठवड्यात अनेक गुंतागुंत वाढते. यात विष्ठेतून रक्त येणे, निमोनिया, पाण्याची मात्रा कमी होते. काही रुग्णाच्या शरीरावर पुरळही येतात. याच टप्प्यात रुग्णाचे प्लेटलेट्मध्ये कमी होतात. यामुळे सुरुवातीलाच डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचा ठरते.

-बालकांसोबतच मोठ्यांनाही आजार

डेंग्यूसोबतच टायफाईडचे रुग्ण दिसून येत आहेत. बालकांसोबत मोठेही या आजाराने पीडित आहेत. साधारण १०० रुग्णांमधून जवळपास १० रुग्ण आढळून येत आहे. स्वच्छता पाळणे, बाहेरील व उघड्यावरील खाद्य पदार्थ टाळणे, गरम आणि ताजे अन्नाचे सेवन करणे, हाच यावर उपाय आहे.

-डॉ. सुचित बागडे, बालरोग तज्ज्ञ

टॅग्स :foodअन्न