शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

गुटखा नव्हे, सोप खा

By admin | Updated: July 29, 2014 00:52 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) स्वच्छतेसाठी अधिष्ठात्यांपासून ते अधीक्षकांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ घेऊन त्यांना सोप देऊन

मेडिकलची गांधीगिरी : स्वच्छतेला घेऊन रुग्णालय प्रशासन गंभीरनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) स्वच्छतेसाठी अधिष्ठात्यांपासून ते अधीक्षकांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ घेऊन त्यांना सोप देऊन गांधीगिरी केली. विशेष म्हणजे, सोमवारी सकाळी १० वाजतापासून सुरू झालेल्या या अभिनव उपक्रमात अर्ध्या तासातच गुटख््यांच्या पुडीने बादली भरली. महिनाभरापूर्वी ‘मिसेस सीएम’ सत्त्वशीला चव्हाण यांनी मेडिकलला भेट दिली. त्यांनी येथील अस्वच्छतेवर नाराजी व्यक्त केली होती. याची स्वत: दखल घेत पुणे येथील १० स्वच्छता कर्मचाऱ्यांना मेडिकलमध्ये पाठविले. येथील कर्मचाऱ्यांनी स्वच्छता कशी करावी, याचे जणू धडेच दिले. मागील अनेक वर्षांमध्ये कधीही न झालेली स्वच्छता या चमूने १२ दिवसांत करून दाखविली. त्यामुळे ही स्वच्छता नेहमीसाठी कायम राहावी यासाठी मेडिकल प्रशासनाने कंबर कसली आहे. विशेष म्हणजे, नव्याने पदभार सांभाळलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश हेडाऊ, उपअधीक्षक डॉ. सुभाष ठाकरे आणि डॉ. रमेश पराते हे स्वच्छतेकडे विशेष लक्ष ठेवून आहेत. त्यांच्याच कल्पनेतून ही गांधीगिरी करण्यात आली.आज सकाळी १० वाजताच्या सुमारास मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, डॉ. एन.जी. तिरपुडे, डॉ. अपूर्व पावडे, डॉ. हेडाऊ, डॉ. पराते, डॉ. ठाकरे, डॉ. मटकरी यांनी बाह्यरुग्ण विभागा(ओपीडी)समोर उभे राहून गुटखा खाऊन येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नागरिकांना थांबविले. त्यांच्याशी प्रेमाने बोलून गुटखा तोंडातून बाहेर फेकण्याची विनंती केली. बाजूला पाणी भरून ठेवलेल्या बादलीतून पाणी घ्यायला लावून चूळ भरण्यास सांगितले. खिशातील गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ बादलीत टाकण्यासही सांगितले. त्यानंतर त्यांना सोप खाऊ घातली. विशेष म्हणजे, अधिकाऱ्यांनी कोणत्याही माणसाचे खिसे तपासले नाही. या एक तासाच्या वेळेत अधिकाऱ्यांनी १२५ च्यावर लोकांना सोप खाऊ घातली. मेडिकल प्रशासनाचा दंड न आकारता रुग्णालयात गुटखाबंदीला घेऊन स्वच्छता पाळण्याचा हा प्रयत्न किती यशस्वी होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)