शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

‘ई-कचरा’ साठलाय, ‘नो टेन्शन’ !

By admin | Updated: January 12, 2017 02:11 IST

भविष्यातील प्रदूषणात सर्वात मोठा घटक ठरू शकणाऱ्या ‘ई-कचऱ्या’चा धोका नागपूरलादेखील जाणवू लागला आहे.

संक्रांतीच्या मुहूर्तावर होणार संकलन : मैत्री परिवार, नागपूर मनपा व संघाचा संयुक्त उपक्रम नागपूर : भविष्यातील प्रदूषणात सर्वात मोठा घटक ठरू शकणाऱ्या ‘ई-कचऱ्या’चा धोका नागपूरलादेखील जाणवू लागला आहे. सर्वात जास्त ‘ई-कचरा’ तयार होणाऱ्या देशांतील मोठ्या शहरांत नागपूर दहाव्या क्रमांकावर आहे. हीच बाब लक्षात ठेवून मैत्री परिवार, नागपूर महानगरपालिका व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोककल्याण समितीने पुढाकार घेतला आहे. संक्रांतीचा मुहूर्त साधून १५ जानेवारी रोजी उपराजधानीत ‘ई-कचरामुक्त नागपूर’ या मोहिमेची सुरुवात करण्यात येणार आहे. शहरातील विविध ठिकाणी ‘ई-कचरा’ संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. यावेळी मैत्री परिवार संस्थेचे सचिव प्रमोद पेंडके, प्रा.विजय शहाकार, मकरंद पांढरीपांडे, विष्णू मनोहर हे प्रामुख्याने उपस्थित होते. संपूर्ण वर्षभर ही समस्या सोडविण्यासाठी जनजागृती व कृतिकार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवाय शाळा-महाविद्यालयांचीदेखील मदत घेण्यात येणार आहे. संपूर्ण शहरात विविध ‘झोन’निहाय संकलन केंद्र उभारण्यात येतील. नागपूर मनपानेदेखील ई-कचरा संकलनासाठी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. (प्रतिनिधी)