शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ई - लायब्ररीतून भविष्यात प्रज्ञावंत विद्यार्थी घडतील : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 23:11 IST

महापालिकेच्या माध्यामातून बजेरियासारख्या भागात उभारण्यात येणाऱ्या ई -लायब्ररीतून भविष्यात अटलजींसारखे प्रज्ञावंत विद्यार्थी घडतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

ठळक मुद्देमहापालिकेच्या ई-लायब्ररीचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या माध्यामातून बजेरियासारख्या भागात उभारण्यात येणाऱ्या ई -लायब्ररीतून भविष्यात अटलजींसारखे प्रज्ञावंत विद्यार्थी घडतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. बजेरिया येथील ई -लायब्ररीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, आमदार विकास कुंभारे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त अझिझ शेख आदी उपस्थित होते.गडकरी म्हणाले, या लायब्ररीच्या माध्यमातून भविष्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातील. येथून भविष्यात उत्कृष्ट दर्जाचे इंजिनिअर, वैज्ञानिक, डॉक्टर तयार होतील, असा मला विश्वास आहे. नागपूरचा विकास हा केवळ रस्ते, उद्याने यापुरता मर्यादित न राहता चौफेर विकास व्हायला पाहिजे. त्यात शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा या सर्व क्षेत्रातील विकास आवश्यक आहे.प्रास्ताविकातून दयाशंकर तिवारी यांनी ई -लायब्ररी तयार करण्यामागील पार्श्वभूमी आणि सविस्तर माहिती दिली. ही लायब्ररी एका ग्रीन इमारतीत आहे. या लायब्ररीला आयआयटी खरगपूरशी जोडण्यात आलेले आहे. यामुळे विद्यार्थ्यांंना ज्ञानार्जनासाठी पूर्ण सहकार्य मिळेल. या लायब्ररीमध्ये ब्रेल लिपी असणाºया संगणकाचा समावेश करण्यात आल्याची माहिती दिली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव या लायब्ररीला देण्यात येणार आहे. लायब्ररीवर ५ कोटींचा खर्च केला जाणार आहे. तीन मजल्याच्या या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर १२५ विद्यार्थी बसू शकतील असा हॉल, दुसऱ्या मजल्यावर २५ संगणक व एकत्रित अभ्यासाची सुविधा, कार्यालय, तिसऱ्या मजल्यावर सौर ऊर्जेचे पॅनल राहणार आहे.भविष्यात अटलजींसारखे प्रज्ञावंत विद्यार्थी या लायब्ररीतून घडावे हा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या लायब्ररीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच कोटीच्या निधीला मंजुरी दिली होती.हा प्रकल्प मुख्य अभियंता उल्हास देबडवार, मनोज तालेवार यांच्या नेतृत्वात उपअभियंता रवि बुंदाडे, कनिष्ठ अभियंता सुरेंद्र दुधे, स्थापत्य सहायक सुनील दुमाने यांच्या निरीक्षणात तयार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला नगरसेविका सरला नायक, रूपा राय, विलास त्रिवेदी, राजेश बागडी, अर्चना डेहनकर, बंडू राऊत आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाlibraryवाचनालय