शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

शहरात धावणार ‘ई-आॅटो’

By admin | Updated: September 7, 2015 02:54 IST

इंधनाची मागणी भविष्यात वाढणार आहे. त्यामुळे अनेक समस्यांना समोरे जावे लागू शकते.

सुमेध वाघमारे ल्ल नागपूरइंधनाची मागणी भविष्यात वाढणार आहे. त्यामुळे अनेक समस्यांना समोरे जावे लागू शकते. कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी बॅटरीवरील वाहनांचा विकास आणि वापर यासाठी आता शासनाने पुढाकार घेतला आहे. नागपुरात तीन आॅटोरिक्षांना बॅटरीवर चालविण्यासाठी प्रायोगिक स्तरावर ‘मिनिस्ट्री आॅफ रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड हायवे’ (एमओआरटीएच) मंजुरी दिली आहे. ‘ई-रिक्षा’सोबतच आता ‘ई-आॅटो’मुळे नागपुरातील प्रदूषणाची पातळी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. देशातील इंधनाची वाढती मागणी आणि प्रदूषणामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी २०२० पर्यंत सुमारे ७० लाख हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर आणण्याची केंद्र सरकारची योजना आहे. याचा मुख्य उद्देश भारताची खनिज तेल आणि इंधनावर असणारे अवलंबित्व कमी करणे व त्यावर होणारा मोठा खर्च कमी करणे हा आहे. बॅटरी व पेट्रोल किंवा डिझेलवर संयुक्त चालणारी, अशी हायब्रीड वाहनांमध्ये नागपुरात कार व दुचाकीच्या माध्यमातून दिसून येत आहे. तर केवळ बॅटरी आॅपरेटेडमध्ये ‘ई-रिक्षा’ नागपुरात धावत आहे. आता यात आॅटोरिक्षांची भर पडणार आहे. १० सप्टेंबर ते ३० डिसेंबर पर्यंत तीन आॅटोरिक्षांना प्रायोगिक स्तरावर चालविण्यासाठी ‘मिनिस्ट्री आॅफ रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड हायवे’ने (एमओआरटीएच) याला विशेष मंजुरी दिली आहे. हे आदेश परिवहन सचिवांकडून परिवहन आयुक्तांना देण्यात आले असून या संदर्भातील सूचना नागपूर शहर आरटीओला नुकत्याच मिळाल्या आहेत. या आॅटोरिक्षा शहरातील एका महाविद्यालयाने विकसित केल्या आहेत.प्रदूषणाची पातळी कमी होईलनागपूरसारख्या गजबजलेल्या शहरात १४ लाख वाहने रस्त्यावर धावत असल्याने प्रदूषणाची पातळी नेहमीच उच्चांकी असते. त्यामुळे, पर्यावरणपूरक आणि 'झिरो पोल्युशन' करणाऱ्या ‘ई-आॅटोरिक्षा’ला अंतिम मंजुरी मिळाल्यास नागपूर आदर्श शहर ठरण्याची शक्यता आहे. यातील आव्हाने ही प्रचंडे आहेत. परंतु ही एक काळाची गरज नक्कीच आहे. सरकारने या दिशेने पावले उचलली आहेत. परंतु त्याचा पाठपुरावा आणि अंमलबजावणी जरुरी असल्याचे परिवहन खात्यातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे. असे आहे बॅटरी आॅटोरिक्षाआॅटोरिक्षामधील पेट्रोलवर चालणारे इंजिन काढून बॅटरी आॅपरेटेड इंजिन लावण्यात आले आहे. अ‍ॅटोमोटिव्ह रिसर्च सेंटर (एआरआय) पुणे यांच्याकडून प्रायोगिक स्तरावर धावणाऱ्या या आॅटोरिक्षाची तपासणी करण्यात येईल. यात टायर, बॅटरी, इंजिनची क्षमता, सुरक्षितता, किती वजन घेऊन आॅटो धावू शकतो अशा विविध स्तरावर तपासणी होईल. त्यानंतरच एआरआयची अंतिम मंजुरी मिळेल.