शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दयाशंकर तिवारी यांची पोलीस कर्मचाºयांना अर्वाच्य शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:55 IST

भाजपा नेत्यांच्या दादागिरीचे सत्र सुरूच आहे. रविवारी रात्री पुन्हा यात भर पडली.

गणेशपेठ पोलीस स्टेशन परिसरातील घटना : पोलिसात असंतोष; राष्ट्रवादीची कारवाईची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपा नेत्यांच्या दादागिरीचे सत्र सुरूच आहे. रविवारी रात्री पुन्हा यात भर पडली. महापालिकेतील माजी सत्तापक्षनेते व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस कर्मचाºयांना धमकी देत शिवीगाळ केली. घटनेच्यावेळी महिला पोलीस कर्मचारी हजर होत्या. विशेष म्हणजे तिवारी शिवीगाळ करीत असताना गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या एका जागरूक महिला कर्मचाºयाने याचे मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटींग केले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपा नेत्यांची मनमानी उघडकीस आलीव्हायरल झालेल्या व्हिडिओत तिवारी हे कशाप्रकारे वाद घालत आहेत. ड्युटीवरील पोलीस कर्मचाºयांना धमकावत आहेत. तसेच शिवीगाळ करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यावेळी महिला उपस्थित असल्याचेही त्यांना भान नव्हते. रात्री उशिरापर्यंत आपण पोलिसांची मदत करीत असतो. मात्र पोलीस आपल्यालाच मदत करीत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे ‘लोकमत’कडे हा व्हायरल झालेला व्हिडिओ उपलब्ध आहे. एखादा लोकप्रतिनिधीच पोलिसांसोबत असा व्यवहार करीत असेल तर यावर अनेक प्रश्न निर्माण होतात.होय, मी शिवीगाळ केली : दयाशंकर तिवारीवैभव दीक्षित या विद्यार्थ्याला वाहतूक पोलिसांनी दारूच्या नशेत काठीने मारहाण केली. यात त्यांचे डोके फुटले होते. परंतु त्याला रुग्णालयात उपचारासाठी न नेता पोलीस स्टेशनमध्ये दोन तास बसवून ठेवले. यामुळे मी संतप्त झालो. रागाच्या भरात माझ्या तोंडून काही अपशब्द निघाले. यासाठी मी क्षमा मागतो. मारहाण करणारा वाहतूक पोलीस कर्मचारी किशोर रमेश जाधव आहे. तो दारू प्यायला होता. ड्युटी आॅफिसर कांडेकर यांनीही असभ्य वर्तन केले. जाधव यांची मेयो रुग्णालयात तपासणी केली असता जाधव दारू प्यायल्याचे स्पष्ट झाले.विनाकारण काठीने मारले, वडिलांना अटक करण्याची धमकी : वैभवरविवारी रात्री मोक्षधाम घाट चौकात ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह मोहिमेवर तैनात असलेले पोलीस कर्मचारी किशोर जाधव याने काठीने मारहाण केल्याचा दावा महाविद्यालयीन विद्यार्थी वैभव दीक्षित यांनी केला आहे. मित्रासोबत बजेरिया येथून मेडिकल चौकाकडे जात होतो. मोक्षधाम चौकात तैनात साध्या वेषातील एका पोलीस कर्मचाºयाने विनाकरण डोक्यावर व खांद्यावर काठीने मारले. त्यानंतर दारू प्यायले आहे का अशी विचारणा केली. परंतु तपासणी केली असता दारू पिले नसल्याचे निदर्शनास आल्याने निघून जाण्यास सांगितले. वडिलांना बोलवतो, असे म्हटल्यानंतर तैनात पोलीस कर्मचाºयांनी वडिलांना अटक करण्याची धमकी दिली. गणेशपेठ पोलीस स्टेशनला दोन तास बसवून ठेवले. संबंधित पोलिसांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे. मेयो,मेडिकल रुग्णालयात तपासणी केली असता पोलीस कर्मचारी दारू प्यायल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती वैभव दीक्षित यांनी दिली. दरम्यान या संदर्भात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी शहर अध्यक्ष नूतन रेवतकर यांनी पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांच्याकडे तक्रार करून तिवारी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.