शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

द्वादशीवार, एलकुंचवार यांना जीवन साधना पुरस्कार

By admin | Updated: August 3, 2014 00:51 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ९१ व्या स्थापना दिनानिमित्त सोमवारी ४ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता विशेष समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून

कृष्णा कांबळे, पटेल यांचाही समावेश : विद्यापीठाचा स्थापना दिन ४ लानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ९१ व्या स्थापना दिनानिमित्त सोमवारी ४ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता विशेष समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोलकाता उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश जे.एन. पटेल तर अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू अनुपकुमार उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक प्रा. सुरेश व्दादशीवार, प्रसिद्ध नाटककार प्रा. महेश एलकुंचवार, डॉ. कृष्णा कांबळे आणि डॉ. थ्रिटी पटेल यांना ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विद्यापीठाकडून दरवर्षी आदर्श प्राचार्य, शिक्षक, अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार दिले जातात. यंदा आदर्श प्राचार्य पुरस्कार पुंजाबाई पटेल शिक्षण महाविद्यालय गोंदियाचे प्राचार्य डॉ. केशव भांडारकर व कवी कुलगुरू कालिदास इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्स रामटेकचे प्राचार्य डॉ. भास्कर पटेल यांना जाहीर झाले आहेत.आदर्श शिक्षक पुरस्कार विद्यापीठाचे भूविज्ञानशास्त्र विभागाचे डॉ. दीपक मालपे, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रतिभा सिरिया व सेठ केसरीमल पोरवाल कॉलेज कामठीच्या डॉ. श्रीबाला देशपांडे यांना जाहीर झाले आहे. आदर्श अधिकारी पुरस्कारासाठी विद्यापीठाच्या अंकेक्षण विभागाचे सत्यदेव रामटेके व आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारासाठी पंकज बाबरे व नबीरा महाविद्यालयाचे जावेद अहमद इरशाद यांची निवड करण्यात आली आहे..विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार राजीव गांधी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचे शंतून ठेंगडी व रामदेवबाबा कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचा विद्यार्थी अर्चना दास यांना जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनीं म्हणून डॉ. आंबेडकर कॉलेजची गायत्री टेकाडे व हिस्लॉप कॉलेजची अवनिका गुप्ता यांची निवड झाली आहे. याशिवाय इतरही पुरस्कारांची घोषणा यावेळी करण्यात आली.पत्रकार परिषदेला कुलसचिव डॉ. अशोक गोमासे,डॉ. श्रीकांत कोमावार, डॉ. सिद्धार्थ काणे, उपकुलसचिव प्रशांत मोहिते व प्रदीप बिनीवाले उपस्थित होते. (प्रतिनिधी)