शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मुलामुलींना सर्वोत्तम शिक्षण देणे वडिलांचे कर्तव्य

By admin | Updated: September 21, 2015 03:11 IST

स्वत:च्या मुलामुलींची सर्वप्रकारची काळजी घेणे व त्यांना सर्वोत्तमातील सर्वोत्तम शिक्षण देणे वडिलांचे कर्तव्य आहे,

नागपूर : स्वत:च्या मुलामुलींची सर्वप्रकारची काळजी घेणे व त्यांना सर्वोत्तमातील सर्वोत्तम शिक्षण देणे वडिलांचे कर्तव्य आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात व्यक्त केले आहे.या प्रकरणातील मंगेश व मनीषा हे दाम्पत्य विभक्त झाले आहे. ९ एप्रिल १९९५ रोजी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना मानवी नावाची मुलगी आहे (तिन्ही नावे काल्पनिक). मनीषा व मानवीने मंगेशकडून पोटगी मिळण्यासाठी नागपूर कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका प्रलंबित आहे. १६ आॅक्टोबर २०१४ रोजी कौटुंबिक न्यायालयाने याचिकेशी संलग्नित अर्ज निकाली काढताना दोघींना प्रत्येकी ३००० रुपये पोटगी देण्याचे अंतरिम निर्देश दिले आहेत. तसेच मानवीच्या शिक्षणाकरिता तात्पुरती व्यवस्था म्हणून ५० हजार रुपये देण्यास सांगितले आहे. या आदेशाविरुद्ध मंगेशने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी ही याचिका फेटाळताना वरीलप्रमाणे मत व्यक्त केले आहे.(प्रतिनिधी)मानवीने दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळविले असून, ती सध्या अकरावीचे शिक्षण घेतानाच वैद्यकीय परीक्षेचीही तयारी करीत आहे. तिने एकदा ६४ हजार तर दुसऱ्यांदा ४० हजार रुपये शैक्षणिक शुल्क भरले आहे. तसेच तिला वैद्यकीय परीक्षेच्या शिकवणीसाठी १ लाख ३५ हजार रुपये द्यायचे आहेत. ही परिस्थिती पाहून न्यायालयाने मंगेशचे कान उपटले. मानवीचे गुण पाहता ती उज्ज्वल भविष्यासाठी सर्वोत्तम शिक्षण घेण्यास पात्र आहे तसेच ती त्याकरिता सक्षम आहे. यामुळे तिला आर्थिक सहकार्य करण्याच्या जबाबदारीपासून पळण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशात काहीच चुकीचे नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)आर्थिक परिस्थिती चांगलीमंगेश वेकोलिमध्ये कार्यरत असून त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ही बाब न्यायालयाने हा आदेश देताना विचारात घेतली आहे. मंगेशने प्लॉट व सोन्या-चांदीचे दागिने खरेदी केले आहेत. कौटुंबिक न्यायालयाने केवळ अंतरिम आदेशाचा अर्ज निकाली काढला आहे. मुख्य याचिका अद्याप प्रलंबित आहे. यामुळे मंगेशला कौटुंबिक न्यायालयात आवश्यक पुरावे सादर करून स्वत:चे म्हणणे सिद्ध करण्याची संधी आहे, असेही उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.