शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यापूर्वी डांबरीकरण; आता सिमेंटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:29 IST

महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना गेल्या सहा महिन्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आलेल्या प्रभाग २३ (अ)मधील हिवरीनगर येथील रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात आहे.

ठळक मुद्देहिवरीनगरमध्ये जनतेच्या पैशाचा दुरुपयोग : कंत्राटदाराला बिलही दिले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना गेल्या सहा महिन्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आलेल्या प्रभाग २३ (अ)मधील हिवरीनगर येथील रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात आहे. हा रस्ता चांगला होता. त्यावर खड्डे नव्हते. असे असतानाही सिमेंटीकरण केले जात आहे. यात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी प्रभाग २३(ड)चे नगरसेवक दुनेश्वर पेठे यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव व आयुक्त अश्विन मुदगल यांच्याकडे केली आहे.वर्धमाननगरनजीकच्या हिवरी ले-आऊ ट येथे मे. ग्लोबल इंजिनीअरिंग वर्कला अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचे ६८ लाखांचे काम देण्यात आले होते. गेल्या मार्च महिन्यात या कामाचे बिल देण्यात आले. यातील एमआयजी कॉलनी ते जयेश किराणा, हनुमान मंदिर ते राजेश अग्रवाल यांच्या घरापर्यंतचे अंतर्गत रस्ते चांगले होते. असे असूनही या रस्त्यांचे सिमेंटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच या मर्गाच्या दोन्ही बाजूला अगोदरच आयब्लॉक लावण्यात आलेले आहे. त्यावर पुन्हा नवीन ब्लॉक लावले जात आहे.या रस्त्यांची अवस्था चांगली असताना सिमेंटीकरण कशासाठी केले जात आहे. सिमेंटीकरणामुळे रस्ता उंच व घरे खाली, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी दुनेश्वर पेठे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी महापालिका प्रशासनाला याची माहिती दिली.महापालिकेच्या निधीचा हा दुरुपयोग असून, या प्रभागातील एका वजनदार नगरसेवकाच्या पुढाकाराने अशी चुकीची कामे होत असल्याची चर्चा आहे.