शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

खोपडेंच्या शैक्षणिक पात्रतेत तफावत

By admin | Updated: June 24, 2015 03:02 IST

खोटी शैक्षणिक पात्रता दाखविण्याचे एकएक प्रकरण समोर येत असताना आता पूर्व नागपूरचे आमदार व भाजपाचे शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे ....

विधानसभा सदस्यत्व रद्द करा : राष्ट्रवादीची मागणी नागपूर : खोटी शैक्षणिक पात्रता दाखविण्याचे एकएक प्रकरण समोर येत असताना आता पूर्व नागपूरचे आमदार व भाजपाचे शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात दोन वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता नमूद केल्याचे समोर आले आहे.खोपडे यांनी २००९ व २०१४ च्या निवडणुकीत सादर केलेले शपथपत्र जारी करीत खोपडे यांनी शिक्षणाच्या बाबतीत खोटे शपथपत्र दिल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. निवडणूक आयोगाची फसवणूक केल्यामुळे खोपडे यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणीही लोंढे यांनी केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने आ. खोपडे यांनी २००९ मध्ये सादर केलेले शपथपत्र व २०१४ मध्ये जारी केलेले शपथपत्र प्रसिद्ध केले आहे. २००९ च्या निवडणूक शपथपत्रात आ. खोपडे यांनी त्यांची शैक्षणिक पात्रता १२ वी पास व बी.कॉम. प्रथम वर्ष अशी नमूद केली आहे. तर त्यानंतर पाच वर्षांनी २०१४ मध्ये सादर केलेल्या निवडणूक शपथपत्रात शैक्षणिक पात्रता ७ वी पास असल्याचे व विद्या नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इतवारी येथून पास झाल्याचे नमूद केले आहे. एकाच व्यक्तीने दिलेल्या दोन शपथपत्रात वेगवेगळी शैक्षणिक पात्रता कशी दाखविली जाऊ शकते, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला असून याप्रकरणी खोपडे यांनी निवडणूक आयोगाची सपशेल फसवणूक केली असल्याचा दावाही लोंढे यांनी केला आहे. नैतिकतेवर बोलणारी भाजपा आता खोटे शपथपत्र देणाऱ्यांवर गप्प का, असा सवाल लोंढे करीत याप्रकरणी पक्षाने खुलासा करावा, अशी मागणीही लोंढे यांनी केली आहे.याबाबत आ. खोपडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, लोंढे हे राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आहेत. त्यांनी आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर राज्य पातळीवरील प्रकरणे हाताळण्यासाठी केला असता तर बरे झाले असते. आपण निवडणूक आयोगाची कुठलीही फसवणूक केलेली नाही. २००९ मध्ये शपथपत्रात नजरचुकीने शिक्षण १२ वी पास व बी.कॉम. नमूद करण्यात आले होते. २०१४ मध्ये आपण ती चूक सुधारली, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)२००९ मध्ये भाजपच्या सर्वच उमेदवारांनी एकाच अर्जनविसाकडे शपथपत्र तयार केले. तेथे नजरचुकीने दुसऱ्या कुठल्या उमेदवाराचे १२ वी पास व बी.कॉम. प्रथम वर्ष हे शिक्षण माझ्या शपथपत्रात नमूद करण्यात आले. त्या वेळी घाईघाईत ही बाब लक्षात आली नाही. ही नजरचूक लक्षात आल्यानंतर २०१४ मध्ये त्याच दुरुस्ती केली व ७ वी पास नमूद केले. या नजरचुकीसाठी मी आधीच जनतेची माफी मागितली आहे. मला फसवणूक करायची असती तर मी बी.कॉम. पदवी पूर्ण झाल्याचे नमूद केले असते. मात्र, मलाच खोट्याचा आधार नको आहे. राजकीय द्वेषातून कुणी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तरी जनता माझ्या पाठीशी आहे.- आ. कृष्णा खोपडेशहर अध्यक्ष, भाजपा