शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

व्हीव्हीपॅटमुळे मतदान अधिक पारदर्शक : अश्विन मुदगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:38 IST

मतदानासाठी वापरण्यात येणारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हे अत्यंत सुरक्षित आहे. मतदारांना आपल्या मतासंदर्भात ७ सेकंदापर्यंत पाहण्याची सुविधा व्हीव्हीपॅटमुळे उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी शनिवारी दिली.

ठळक मुद्देमाध्यम संवाद कार्यक्रमात संपादकांशी चर्चा आपले मत ७ सेकंदपर्यंत पाहण्याची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मतदानासाठी वापरण्यात येणारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हे अत्यंत सुरक्षित आहे. मतदारांना आपल्या मतासंदर्भात ७ सेकंदापर्यंत पाहण्याची सुविधा व्हीव्हीपॅटमुळे उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी शनिवारी दिली.वनामती येथे आयोजित केलेल्या माध्यम संवाद कार्यक्रमात संपादकांशी जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, रामटेक लोकसभा मतदार संघाचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, पोलीस अधीक्षक राकेश ओला, विशेष शाखेच्या उपायुक्त निर्मलादेवी एस., उपनिवडणूक निर्णय अधिकारी राजलक्ष्मी शहा, तहसीलदार प्रताप वाघमारे आदी उपस्थित होते.नागपूर जिल्ह्यात व्हीव्हीपॅटचा प्रथमच वापर करण्यात येत असून, दोन्ही उपकरणांमध्ये तंत्रज्ञान, तांत्रिक सुरक्षितता आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्याकडून होणारा सुरक्षित वापर, याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांनी माहिती दिली. ही उपकरणे कोणत्याही इतर उपकरणांना जोडता येत नाहीत. त्यामुळे मतदानासाठी वापरण्यात येणारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हे अत्यंत सुरक्षित आहे. यामध्ये कुणालाही हस्तक्षेप वा छेडछाड करता येत नाही तसेच व्हीव्हीपॅटला कुणीही हॅक करू शकत नाही. व्हीव्हीपॅटमुळे मतदाराने केलेले मतदान प्रत्यक्ष स्क्रीनवर ७ सेकंदपर्यंत पाहण्याची सोय असल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी संपादकांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक मतदान करण्याचा अनुभव घेतला. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी संपादकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMediaमाध्यमे