शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

कारवाईच्या धाकामुळे सूत्रधाराची धावपळ

By admin | Updated: December 16, 2015 03:23 IST

लोकमतच्या वृत्ताने सडक्या सुपारीचा जीवघेणा धंदा करणाऱ्या रॅकेटमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

सडक्या सुपारीचा जीवघेणा धंदा : अनेकांच्या भेटीगाठीनागपूर : लोकमतच्या वृत्ताने सडक्या सुपारीचा जीवघेणा धंदा करणाऱ्या रॅकेटमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. कारवाईचे संकेत मिळताच मंगळवारी दिवसभर या रॅकेटच्या सूत्रधाराने अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या. काहींना ‘लाखोंची स्नेहभेट’ दिली. त्याबदल्यात एका अधिकाऱ्याने रॅकेटच्या सूत्रधाराला काही दिवस धंदा बंद ठेवण्याचा सल्ला दिल्याची आतल्या गोटातील माहिती आहे.कॅन्सरसारख्या भयावह रोगाच्या जबड्यात लोटणाऱ्या सडक्या सुपारीची बिनबोभाट विक्री करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार उपराजधानीत सर्रास सुरू असल्याचे वृत्त लोकमतने सोमवारी आणि मंगळवारी ठळकपणे प्रकाशित केले. या वृत्ताने संबंधितांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या रॅकेटचा सूत्रधार कुख्यात चिंटू तसेच त्याचे साथीदारही हादरले आहे. आपले पाप उघड झाल्यामुळे महाराजही धावपळ करीत आहे. या रॅकेटकडून महिन्याला लाखो रुपयांचा हप्ता घेणारा अधिकारी तसेच नोटांची खेप पोहोचविणाऱ्या पोलिसाकडे चिंटूसह साथीदारांनी धाव घेतली. एका नेत्याने त्यांना हाकलून लावल्याचीही माहिती आहे. कारवाई होण्याची दाट शक्यता लक्षात आल्यामुळे या टोळीने दुपारपासून अनेकांना लाखोंची ‘भेट’ देऊन सांभाळून घेण्याची विनंती केल्याची सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे, कारवाईचा अधिकार असणाऱ्या यंत्रणेतील एकाने त्यांना आमच्यावर दडपण आले आहे. काही दिवस हा धंदा बंद ठेवा, असा सल्ला दिल्याचेही समजते. (प्रतिनिधी)डीसीपीची गोदामावर धडक या प्रकरणात आज पुन्हा धक्कादायक माहिती उघडकीस आली. त्यानुसार शनिवारी मध्यरात्री गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांची रात्रपाळी (नाईट राऊंड) होती. त्यांना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वर्धमाननगरातील एका गोदामात शेकडो पोती सडलेली सुपारी दडवली असून, ती आता बाहेरच्या प्रांतात पाठविली जाणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे डीसीपी शर्मा यांनी प्रारंभी आपले पथक तेथे पाठवले, नंतर स्वत: ते तेथे पोहोचले. त्यांनी सडक्या सुपारीची शेकडो पोती बघितली. त्यानंतर योग्य कारवाईचे आदेश देत पहाटे ते घटनास्थळावरून निघून गेले. औषध प्रशासनाची भूमिका संशयास्पद डीसीपींच्या पथकाने अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी गोदामात बोलवून घेतले. त्यांनी येथील सुपारीचे ‘नमुने’ घेतले. त्यानंतर तपासणीच्या नावाआड हे प्रकरण दडपण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाल्याची संबंधित वर्तुळात चर्चा पसरली. चांगल्या सुपारीतून बाहेर काढलेली ही (सडकी) सुपारी असून, ती संबंधित व्यापारी फेकून देणार होता, असा अहवाल दिला जातो की काय, अशीही शंका व्यक्त केली जाऊ लागली. उपराजधानीत विस्तारलेल्या या जीवघेण्या धंद्याच्या बाबतीत अन्न व औषध प्रशासनाने आतापावेतो गप्पपणाची भूमिका घेतल्यामुळे हे प्रशासनही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या विभागाचा एक अधिकारी संपूर्ण विभागात आधीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचमुळे आता प्रशासनाचे वरिष्ठ कोणती भूमिका स्वीकारतात, त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.