शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते अपघातात राज्यातील ३ वाघ, ५० बिबट्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 11:12 IST

राज्यातील एका वनपरिक्षेत्रातून दुसऱ्या परिक्षेत्रात स्थानांतरण करताना (महामार्ग ओलांडताना) वन्यप्राण्यांच्या रस्ता अपघातात होणाऱ्या मृत्यूची संख्या चिंतेत टाकणारी आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांत वन्यप्राण्यांच्या मृत्यूची संख्या चिंताजनक नागपूर-अमरावती महामार्गावर नुकताच वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: राज्यातील एका वनपरिक्षेत्रातून दुसऱ्या परिक्षेत्रात स्थानांतरण करताना (महामार्ग ओलांडताना) वन्यप्राण्यांच्या रस्ता अपघातात होणाऱ्या मृत्यूची संख्या चिंतेत टाकणारी आहे. मागील दोन वर्षात संपूर्ण राज्यात ३ वाघांचा आणि ५० बिबट्यांचा रस्ता ओलांडताना अपघाती मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे.२०१६ च्या आकडेवारीनुसार संपूर्ण राज्यात १४ वाघांचा मृत्यू झाला. यात ११ नैसर्गिक, एकाचा शिकारीने तर दोन वाघांचा मृत्यू रस्ता अपघातात झाला. तर ७ बिबट्यांची शिकार करण्यात आली असून, २९ बिबट्यांचा मृत्यू रस्ता अपघातात झाले. याचप्रकारे २०१७ मध्ये ९ बिबट्यांची शिकार करण्यात आली तर २१ बिबट्यांचा मृत्यू रस्ता अपघातात झाले.गेल्या वर्षी एक वाघ (बाजीराव) याचा नागपूर-अमरावती महामार्ग ओलांडताना वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. वाघ, बिबट्यांसह इतर वन्यप्राण्यांचेही अपघातात मृत्यू होत आहेत. या महामार्गाला ओलांडून बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी पुढे कोंढाळी, काटोल, कळमेश्वरमार्गे पेंच व्याघ्र प्रकल्पापर्यंत येतात. वन्यप्राण्यांना वाचविण्यासाठी त्यांचे स्थलांतरणही आवश्यक मानले जाते. एकाच परिक्षेत्रात राहिल्याने त्यांचे अस्तित्व संकटात येण्याची भीती असते.

साडेतीन महिन्यात वाघ-बिबट्याचा अपघातात मृत्यूनागपूर-अमरावती महामार्गावर १३ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी कोंढाळी रेंजच्या जुन्या पाण्याच्या शिवाराजवळ एका वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. त्यापूर्वी २९ डिसेंबर २०१७ रोजी अमरावती महामार्गावर बोरमधील प्रसिद्ध वाघ बाजीरावला अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन मारले होते.

धोकादायक ठिकाणी आवश्यक उपाययोजना व्हावीमानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी सांगितले की, वाघ-बिबट किंवा इतर वन्यप्राण्यांचे एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात जाणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ते थांबायला नको. अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या मार्गासाठी वन विभागाची परवानगी घेतली जाते. वन्यप्राण्यांच्या ये-जा यासाठी अंडरपासेस बांधणे आवश्यक आहे. परंतु जे रस्ते अगोदरच बांधले गेले किंवा अभयारण्याला लागून नाहीत अशा रस्त्यांवरील धोकादायक ठिकाणांची ओळख व्हावी आणि तिथे आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.

टॅग्स :Tigerवाघ