शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

त्याने प्रसंगावधानाने वाचविले ३२ जणांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 22:35 IST

धावत्या बसच्या स्टेअरिंगवरच ड्रायव्हरचा हृदयविकाराने मृत्यू झाला. बस हेलकावे खात असल्याचे दिसून येताच प्रवासी ड्रायव्हरच्या कॅबिनच्या दिशेने धावले. कुणाला काही कळत नव्हते. बसचे ब्रेक दाबण्याच्या प्रयत्नात एक प्रवासी बसच्या खाली पडला. पण दुसऱ्या प्रवाशाने प्रसंगावधान साधून शिताफीने बसचा ब्रेक दाबला आणि खाईत जाणाऱ्या बसला रोखून त्याने ३२ जणांचे प्राण वाचविले.

ठळक मुद्देधावत्या बसचालकाचा स्टेअरिंंगवर मृत्यू : खाईत जाणाऱ्या बसचे दाबले ब्रेक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धावत्या बसच्या स्टेअरिंगवरच ड्रायव्हरचा हृदयविकाराने मृत्यू झाला. बस हेलकावे खात असल्याचे दिसून येताच प्रवासी ड्रायव्हरच्या कॅबिनच्या दिशेने धावले. कुणाला काही कळत नव्हते. बसचे ब्रेक दाबण्याच्या प्रयत्नात एक प्रवासी बसच्या खाली पडला. पण दुसऱ्या प्रवाशाने प्रसंगावधान साधून शिताफीने बसचा ब्रेक दाबला आणि खाईत जाणाऱ्या बसला रोखून त्याने ३२ जणांचे प्राण वाचविले.हा चित्रपटाचा प्रसंग नाही तर बुटीबोरी औद्योगिक परिसरात २ ऑगस्टला घडलेला थरारक प्रसंग होय. या प्रसंगाचा प्रत्यक्ष अनुभव घेत प्रवाशांचे प्राण वाचविणारा देवदूत म्हणजे नरेंद्र लोणगाडगे. निर्मल समूहाचे अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांच्या हस्ते शनिवारी नरेंद्रचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.नरेंद्र लोणगाडगे यांनी जेव्हा घडलेला प्रसंग जसाचा तसा वर्णन केला तेव्हा ऐकणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. संवाद साधताना ते म्हणाले, ३२ प्रवासी इंडोरामाचे युनिट असलेल्या स्पेनटेक्स कंपनीचे कर्मचारी आहेत. बस २ ऑगस्टला सकाळी ७ वाजता कर्मचाऱ्यांना घेऊन कंपनीत जात होती. बस बुटीबोरी औद्योगिक परिसरातील मार्गावर धावत होती, पण काही वेळात हेलकावे खाऊ लागली. कुणालाच काही सुचत नव्हते. बसच्या स्टेअरिंगवर ड्रायव्हर निपचित पडून होता. त्यावेळी बस डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या मार्गावर धावू लागली. अचानक घडलेल्या घटनेने सर्व प्रवासी घाबरले. बसचे ब्रेक दाबण्यासाठी समोरील सीटवरील प्रवासी ड्रायव्हरच्या कॅबिनकडे धावले. बस हेलखावे खात असल्यामुळे बसचा दरवाजा उघडला गेला. हेमराज भदाडे बसचे ब्रेक दाबण्यासाठी धावले असता दरवाज्याबाहेर पडले. ते थोडक्यात बचावले. त्यांच्या पायाला मार लागला.नरेंद्रने क्षणाचाही वेळ न घालविता स्टेअरिंगच्या खाली पाय टाकला आणि ब्रेक दाबले. बस क्षणातच रस्त्याच्या कडेला थांबली. हा प्रसंग वेणा नदीजवळील सी.जी. दांडेकर कंपनीसमोर घडला. त्याचवेळी रस्त्यावरून येणारे दोन ट्रक वेगात गेले. बस थांबलेल्या जागेच्या १० पावलांच्या अंतरावर १०० फूट खाई होती. बस थांबली नसती तर सेकंदात खाईत कोसळली असती. त्यानंतर काय घडले असते, याची कल्पनाही करणे शक्य नाही. बसमध्ये १० महिला आणि २२ पुरुष कर्मचारी होते. घटनेनंतर रस्त्यावरून जाणारे लोक गोळा झाले. घटनेची सूचना बुटीबोरी पोलीस ठाण्याला देण्यात आली. या जीवघेण्या घटनेत प्रसंगावधानाने ३२ जणांचे प्राण वाचविल्याबद्दल नरेंद्र लोणगाडगे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 

टॅग्स :Bus DriverबसचालकDeathमृत्यू