शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे नागपुरात दिव्यांगाची फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 10:13 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे शहरातील एका ८५ टक्के दिव्यांग व्यक्तीची अमानुष फरफट होत आहे.

ठळक मुद्देसंगणक टंकलेखन मान्यतेचा प्रस्ताव धूळखातगडकरी यांच्या शिफारशीलाही जुमानले नाही

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे शहरातील एका ८५ टक्के दिव्यांग व्यक्तीची अमानुष फरफट होत आहे. ही व्यक्ती त्यांच्या संगणक केंद्राला संगणक टंकलेखन अभ्यासक्रम (जीसीसीटीबीसी)ची मान्यता मिळावी यासाठी गेल्या दीड वर्षांपासून शिक्षण विभागाचे उंबरठे झिजवत आहे. परंतु, माणुसकीचा पाझर आटलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांचा प्रस्ताव ना मंजूर केला, ना फेटाळला. त्यांना केवळ कार्यालयांच्या हेलपाटा खायला लावले जात आहे.मनोज धोटे (४०) असे या व्यक्तीचे नाव असून ते दसरा रोड, महाल येथील रहिवासी आहेत. २०१३ मध्ये गंभीर अपघात झाल्यामुळे त्यांना ८५ टक्के अपंगत्व आले. ते सामान्य हालचाली व कोणतेही अवजड काम करू शकत नाही. त्यामुळे त्यांना झेपेल असे उपजीविकेचे साधन मिळावे याकरिता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मदत मागण्यात आली होती. गडकरी यांच्या पुढाकाराने कलार्जन फाऊंडेशनने त्यांना संगणक केंद्र टाकून दिले. त्या केंद्राला कलार्जन हेच नाव देण्यात आले आहे. त्यानंतर धोटे यांच्या विनंतीवरून गडकरी यांनी या केंद्राला संगणक टंकलेखन अभ्यासक्रमाची मान्यता मिळावी यासाठी २६ डिसेंबर २०१७ रोजी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला पत्र पाठविले. ते पत्र पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे वर्ग झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त सुखदेव ढेरे यांनी त्याला ५ फेब्रुवारी २०१८ रोजी उत्तर दिले. संबंधित शिक्षण विभागांतून प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्राला मान्यता क्रमांक दिला जाईल असे त्याद्वारे धोटे यांना कळविण्यात आले. यानंतर धोटे यांनी नियमानुसार, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला. खूप फेºया घातल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी एस. एन. पटवे यांनी १६ आॅक्टोबर २०१८ रोजी प्रस्तावाला मान्यता दिली. परंतु, आॅनलाईन प्रक्रिया करण्यात आली नसल्यामुळे त्या प्रस्तावावर पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. शिक्षण उपसंचालक व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त यांना यासंदर्भात पत्रे व स्मरणपत्रे पाठवूनही धोटे यांना दिलासा मिळाला नाही. त्यांची केवळ इकडून तिकडे टोलवाटोलवी करण्यात आली. त्यामुळे त्यांनी थकून शेवटी ‘लोकमत’शी संपर्क साधून ही आपबिती सांगितली.-तर उच्च न्यायालयात दाद मागेनमी ८५ टक्के दिव्यांग असूनही शिक्षण विभागाने माणुसकी दाखवली नाही. वारंवार कार्यालयाच्या फेºया घालायला लावले आणि प्रस्तावावर काहीच ठोस कार्यवाही केली नाही. प्रस्ताव नियमबाह्य असेल तर, तो फेटाळावा, पण अशाप्रकारे छळ करून मनस्ताप देऊ नये. शिक्षण विभागाचा निर्लज्जपणा कायम राहिल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागेन.- मनोज धोटे

टॅग्स :Governmentसरकार