शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे नागपुरातील अनेक वकील आर्थिक अडचणीत : कमाई बंद झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 23:46 IST

दैनंदिन कमाईवर अवलंबून असणारे अनेक वकील लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांची कमाई पूर्णपणे बंद झाली आहे. परिणामी, कुटुंबाच्या पालनपोषणाचा व अन्य खर्च भागविण्याचा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.

ठळक मुद्देकुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न भेडसावतोय

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दैनंदिन कमाईवर अवलंबून असणारे अनेक वकील लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांची कमाई पूर्णपणे बंद झाली आहे. परिणामी, कुटुंबाच्या पालनपोषणाचा व अन्य खर्च भागविण्याचा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.शहरातील मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ, जिल्हा व सत्र न्यायालय, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, ग्राहक तक्रार निवारण मंच, औद्योगिक व कामगार न्यायालय, कुटुंब न्यायालय इत्यादी ठिकाणी अनेक वकील किरकोळ कामे करून आवश्यक गरजा भागविण्यापुरती कमाई करतात. त्यांना कधी मनासारखे पैसे मिळतात तर, कधी निराशा पदरी पडते. त्यात वकिली व्यवसायात जम बसला नाही अशा ज्येष्ठ वकिलांपासून ते नवोदित वकिलांचा समावेश आहे. यातील बरेच वकील बाहेरगावचे असून ते करिअर घडविण्याचे स्वप्न उराशी बाळगून नागपुरात आले आहेत. या वकिलांना लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.लॉकडाऊनमुळे न्यायालयांमध्ये सध्या केवळ तातडीची सुनावणी आवश्यक असलेलीच प्रकरणे ऐकली जात आहेत. परिणामी, उच्च न्यायालय व अन्य कनिष्ठ फौजदारी न्यायालयांमधील कामकाज ९० टक्क्यांपेक्षा जास्त कमी झाले असून इतर न्यायालयांतील न्यायिक कामकाज अपवाद वगळता बंद आहे. कारण, उच्च न्यायालय व अन्य कनिष्ठ फौजदारी न्यायालये वगळता अन्य न्यायालयांमध्ये अशी प्रकरणे क्वचितच असतात. त्याचा मोठा फटका दैनंदिन कमाईवर अवलंबून असलेल्या वकिलांना बसला आहे. या परिस्थितीत त्यांचे जीवन तारेवरची कसरत झाले आहे.डीबीएचा मदतीसाठी पुढाकारजिल्हा विधिज्ञ संघटना (डीबीए) अडचणीतील वकिलांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. संघटनेने दानदात्या वकिलांकडून निधी गोळा केला आहे. त्यातून २०० वकिलांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी २००० रुपये जमा केले जाणार आहेत. आतापर्यंत ७५ वकिलांना ही आर्थिक मदत करण्यात आली आहे. अन्य गरजू वकिलांची यादी तयार केली जात आहे. संघटनेचे अध्यक्ष कमल सतुजा यांनी ही माहिती दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याadvocateवकिल