शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जागा घटल्या, टक्का वाढला पीछेहाटीनंतरही काँग्रेसच्या मतात वाढ

By admin | Updated: February 26, 2017 02:07 IST

नागपूर महानगरपालिका निवडणुका यंदा प्रभागपद्धतीने लढण्यात आल्या होत्या. या पद्धतीमुळे पक्षांच्या मतांचे गणितच बदलले आहे.

योगेश पांडे  नागपूर नागपूर महानगरपालिका निवडणुका यंदा प्रभागपद्धतीने लढण्यात आल्या होत्या. या पद्धतीमुळे पक्षांच्या मतांचे गणितच बदलले आहे. दारुण पराभवाचा सामना करावा लागलेल्या काँग्रेसच्या मतांमध्ये मात्र चक्क वाढ झाली आहे. तर अपक्षांच्या मतांचा टक्का २०१२ च्या तुलनेत चक्क १० टक्क्यांहून अधिक घटला आहे. निवडणुकांत ‘शतक’पार जागा मिळविलेल्या भाजपाच्या मतांची टक्केवारी तर साडेनऊ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या मतांचा हिशेब ‘लोकमत’ने लावला असता संबंधित बाब समोर आली आहे. मागील निवडणुकांत भाजपा व कॉंग्रेसमधील मतांच्या टक्केवारीचा फरक अवघा ४.६२ टक्के इतका होता. यंदा हा फरक सुमारे १०.८० टक्के इतका झाला आहे. मागील वेळच्या तुलनेत भाजपाची आघाडी ६.१८ टक्क्यांनी वाढली. अंतर्गत गटबाजीमुळे यंदा काँग्रेसला प्रचंड फटका बसला. २०१२ मधील ४१ वरून २०१७ मध्ये काँग्रेसच्या जागा थेट २९ वर आल्या. जागांमध्ये घट झाली असली तरी प्रभाग पद्धतीमुळे काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांमध्ये मात्र चक्क ३.४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१२ मध्ये काँग्रेसला २४.९६ टक्के मते मिळाली होती. यंदा हा आकडा २८.४० वर पोहोचला आहे. प्रभागपद्धतीचा फायदा भाजपालाच यंदाच्या निवडणुकांमध्ये चार जागांचा एक प्रभाग करण्यात आला होता. यावरून वाददेखील झाला होता. प्रभागपद्धतीत बदल झाल्याचा सर्वात जास्त फायदा भाजपाला झाला. जागांसोबतच भाजपाच्या मतांमध्येदेखील प्रचंड वाढ झाली आहे. जर एकट्या भाजपाला मिळालेल्या मतांकडे नजर टाकली, तर हा आकडा ३९.२० टक्के इतका आहे. २०१२ मध्ये भाजपाला २९.५८ टक्के मते मिळाली असून मतांची टक्केवारी ९.६२ टक्के इतकी वाढली आहे. शिवसेनेचा बाण दोन टक्क्यांनी वाढला शिवसेनेला नागपुरात अवघ्या दोनच जागा मिळाल्या असल्या तरी त्यांच्या मतांमध्ये २०१२ च्या तुलनेत २ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर बसपा व राष्ट्रवादीच्या मतांमध्ये अनुक्रमे ०.६५ टक्के व ०.१८ टक्के घट झाली आहे.