नागपूर : मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका १५ वर्षीय मुलाचा स्विमींग टँकमध्ये बुडून करुण अंत झाला. रविवारी दुपारी १.३० च्या सुमारास श्यामबाग, सूत गिरणीजवळच्या स्विमींग टँकमध्ये ही घटना घडली.हरपूरनगर मधील रहिवासी अवेज खान तमिज खान (वय १५) हा रविवारी दुपारी १.३० च्या सुमारास चार ते पाच मित्रांसोबत पोहायला गेला. व्यवस्थित पोहणे येत नसल्यामुळे तो पाण्यात बुडाला. बराच वेळ होऊनही अवेज पाण्यातून बाहेर आला नसल्याचे पाहून त्याच्या साथीदारांनी वस्तीत जाऊन नागरिकांना सांगितले. त्यानंतर मोठ्या संख्येत नागरिक घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अवेजला पाण्याबाहेर काढले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अवेज हा नववीचा विद्यार्थी होता. त्याचे वडील मेकॅनिक असून आई गृहिणी आहे. त्याला एक मोठा भाऊ आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली. त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. सक्करदरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.(प्रतिनिधी)
स्विमींग टँकमध्ये बुडून मुलाचा करुण अंत
By admin | Updated: July 6, 2015 02:57 IST