शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

आयात धोरणातील बदलांमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:25 IST

- भाव आणखी कमी होणार : तूर डाळ २० ते २५ रुपयांनी उतरली नागपूर : केंद्र सरकारने आयात धोरणात ...

- भाव आणखी कमी होणार : तूर डाळ २० ते २५ रुपयांनी उतरली

नागपूर : केंद्र सरकारने आयात धोरणात बदल केल्यानंतर लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच देशात सर्व डाळींचे भाव २५ टक्क्यांनी कमी झाले आहेत. ही गरीब आणि सामान्यांसाठी आनंदाची बाब आहे.

दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्यात देशात डाळींच्या भावात तेजी येऊन तूर डाळ १३० रुपये किलो, चणा डाळ ८० ते ९० रुपये, मसूर डाळ ७५ ते ८०, मूग डाळ व उडीद डाळ दर्जानुसार ९० ते १२५ रुपये किलोवर पोहोचली होती. त्यानुसार पुढेही भाववाढीची शक्यता वर्तविली जात होती. पण आता भाव कमी झाल्याने ठोक बाजारात गुरुवारी तूर डाळ दर्जानुसार ८ हजार ते ९४०० रुपये क्विंटल, चणा डाळ ५८०० ते ६४००, मसूर डाळ ६२०० ते ६५००, मूग मोगर व उडीद मोगरचे भाव ६२०० ते ६५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. ऑक्टोबरमध्ये गावराणी तुरीचे भाव ८३०० ते ८४०० रुपये होते, ते आता ६३०० ते ६४०० रुपये असून, २ हजार रुपयांची घट झाली आहे. तर आयातीत तुरीचे भाव ७७०० ते ७८०० रुपयांवरून ५८०० ते ५९०० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. अर्थात १९०० रुपयांची घसरण झाली आहे. चण्याचे भाव ५६०० ते ५७०० रुपयांवरून ४८०० ते ४९०० रुपयांपर्यंत अर्थात ७०० ते ८०० रुपयांची घट झाल्याचे होलसेल ग्रेन अ‍ॅण्ड सीड्स मर्चंट्स असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी सांगितले.

केंद्र सरकारतर्फे आयातीत डाळींसाठी परवाने जारी न करणे हे दरवाढीचे मुख्य कारण आहे. शेतकऱ्यांना चांगला आणि हमीभावापेक्षा कमी भाव मिळू नये म्हणून सरकार डाळींच्या आयातीत टाळाटाळ करीत होती. पण त्याचा विपरीत परिणाम होऊन भाववाढ झाली आणि लोकांनी ओरड सुरू केल्यानंतर सरकार या विषयावर जागरूक झाली. पुढे स्थिती बिघडण्यापूर्वीच डाळींच्या आयातीसाठी परवाने जारी केले. चार लाख टन तूर डाळ आयातीतील ३१ डिसेंबरपर्यंत परवाने देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय नाफेडच्या माध्यमातून बाजारात तूर डाळ विक्रीचा दबाब टाकण्यात आला. मसूर डाळीवर आयात शुल्क कमी करण्यात आले. सरकारच्या या आयात धोरणाने सर्व डाळींचे दर २५ टक्के कमी झाले आहेत. याशिवाय यावर्षी हवामान डाळींसाठी अनुकूल राहिल्याने चांगले पीक येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सरकारने आयात धोरणात बदल केल्याने शेतकरी नाराज आहेत. अनेक वर्षांनंतर यंदा ऑक्टोबरमध्ये हमीभावापेक्षा जास्त भाव मिळाल्याने शेतकरी खुश होते. पण आता भाव कमी झाल्याने शेतकरी निराश आहेत.

सध्या नवीन तुरीची आवक सुरू झाली असून, पुढील महिन्यात वाढणार आहे. त्यामुळे भाव आणखी कमी होतील. फेब्रुवारीमध्ये मसूर व चण्याचे नवीन पीक येईल. त्यामुळे भाव नियंत्रणात राहतील. डाळींचे भाव कमी झाल्याने गृहिणींचे महिन्याचे बजेट कमी होणार आहे.