शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बीडीओंच्या बैठकीतील अनुपस्थितीवर खडाजंगी

By admin | Updated: May 7, 2014 03:18 IST

गटविकास अधिकाऱ्यांना सभागृहात उपस्थित राहण्याची सूट देण्याच्या मुद्यावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सदस्यात चांगलाच कलगितुरा रंगला.

 यवतमाळ : गटविकास अधिकार्‍यांना सभागृहात उपस्थित राहण्याची सूट देण्याच्या मुद्यावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सदस्यात चांगलाच कलगितुरा रंगला. सदस्यांनी आपला संताप व्यक्त केला. मात्र सीईओ आपल्या निर्णयावर अखेरपर्यंत ठाम राहिले. सर्वसाधारण सभेत सुरुवातीला गटविकास अधिकार्‍यांच्या उपस्थितीचा मुद्दा ऐरणीवर आला. गटविकास अधिकार्‍यांना सभागृहात येण्याची आवश्यकता नाही. त्यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नांची पूर्तता मी करेल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य संतापले. बीडीओंंना समोरासमोर आदेश दिल्यानंतरही कारवाई करत नाही. माहिती दडवितात, अशा वेळी सभागृहात न येण्याची मूभा देणे म्हणजे त्यांना आयती संधी होय. हा निर्णय चुकीचा आहे, असा मुद्दा सदस्यांंनी मांडला. मात्र सीईओंनी आपल्या कुठल्याही प्रश्नाला मी उत्तर देईल.

प्रश्न सोडविण्याची जबाबदारी माझी असेल जो अधिकारी नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर थेट कारवाई करण्याची हिंमत दाखवेल, असे त्यांनी सांगितले. सदस्यांनी या निर्णयाला विरोध केल्यानंतरही डॉ. कलशेट्टी आपल्या निर्णयावर ठाम होते. यानंतर कृषी प्रदर्शनाच्या अपहाराचा मुद्दा देवानंद पवार यांनी उपस्थित केला. केलेला खर्च अमान्य असल्याचे सांगत खर्चाला विरोध दर्शविला. मागील बैठकीच्या कामकाजाच्या इतिवृत्तात उल्लेख नाही. यासोबत चौकशी समिती बसविली आहे. ती माहिती सभागृहापासून दडविण्यात आली. याचा जाब पवार यांनी अध्यक्षांना विचारला. त्यावेळी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी चूक मान्य करीत अहवाल दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. एक महिन्यात चौकशी पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)

  • कुमारीमातांच्या प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी जिल्हा परिषद पाच सदस्यीय समिती स्थापणार.
  • जिल्हा परिषदेची दर महिन्याला सर्वसाधारण सभा होणार असल्याची माहिती अध्यक्षांनी सभागृहात दिली.
  • जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले