शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात ड्रग्स माफिया आबू खानला फिल्मीस्टाईल अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 22:43 IST

गोवा, मुंबईसह देशातील विविध भागातील ड्रगमाफियांच्या नेटवर्कचा हिस्सा असलेला विदर्भातील प्रमुख ड्रगमाफिया आबू फिरोज खान याला गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी फिल्मीस्टाईल अटक केली. आबूच्या अटकेमुळे ड्रग्स तस्करीत गुंतलेले मध्यभारतातील अनेक मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देदेशातील अनेक ड्रगमाफियांसोबत संबंध : ड्रग्स तस्करीच्या नेटवर्कचा खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोवा, मुंबईसह देशातील विविध भागातील ड्रगमाफियांच्या नेटवर्कचा हिस्सा असलेला विदर्भातील प्रमुख ड्रगमाफिया आबू फिरोज खान याला गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी फिल्मीस्टाईल अटक केली. आबूच्या अटकेमुळे ड्रग्स तस्करीत गुंतलेले मध्यभारतातील अनेक मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.गोवा, मुंबईसह मध्य भारतातील अनेक ड्रगमाफियांचा दुवा म्हणून आबू खान ओळखला जातो. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षांपासून आबू ड्रग्स तस्करीत गुंतला आहे. विविध प्रकारच्या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीतील महत्त्वाचा सदस्य म्हणून आबूची सर्वत्र ओळख आहे. महिन्याला लाखोंची खेप इकडून तिकडे करणाऱ्या आबूकडे कोट्यवधींची मालमत्ता अन् अनेक वाहने आहेत. त्याच्यासाठी केवळ तस्करी करणारेच नव्हे तर अनेक गुन्हेगारी टोळ्यातील गुंडही काम करतात. गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने अमिर खान आतिक खान (मुंबई), मोहम्मद वकार ऊर्फ गौस मोहम्मद अनिस, जावेद ऊर्फ बच्चा अत्ताऊल्ला खान आणि अर्शद अहमद अशफाक अहमद या चौघांना चार लाखांच्या एमडी पावडर (ड्रग्स)सह अटक केली होती. ते सध्या गुन्हे शाखेच्या कोठडीत आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने आबू राहत असलेल्या मोठा ताजबाग वस्तीत छापा घातला. पोलिसांची चाहूल लागताच तो पळायला लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला सिनेस्टाईल ताब्यात घेतले.दो से भले चार...!२३ डिसेंबरला अमिर खान आणि मोहम्मद वकार यांना गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल राहुल डिलक्सजवळून अटक केली होती. त्यांच्याकडून २ लाख, १० हजारांचे ७० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले होते. त्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना जावेद आणि अर्शदची नावे मिळाली होती. त्यांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून १ लाख, ७७ हजारांचे एमडी पावडर मिळाले. बच्चा हा आबूचा राईट हॅण्ड म्हणून ओळखला जातो. त्याने आबूचे अनेक पत्ते पोलिसांसमोर उघड केले. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली. आता आबूकडून एक मोठी टोळीच हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थArrestअटक