शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर पोलीस खोदणार ड्रग्ज माफियाचे नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 01:01 IST

गोवा, मुंबईसह देशातील विविध भागातील ड्रगमाफियांचे मध्य भारतातील नेटवर्क मजबूत करणारा ड्रग्जमाफिया आबू ऊर्फ फिरोज खान (वय ४७) याची संपत्ती तसेच त्याच्या संपर्कातील ड्रग्जमाफियांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र, आबूचे नेटवर्क मजबूत करणाऱ्या तसेच त्याच्यासोबत नेहमीच इकडेतिकडे दिसणाऱ्या शहरातील काही पोलीस कर्मचाऱ्यांचा तपास अधिकारी शोध लावणार काय, त्यांच्यावर कारवाई करणार काय, असा प्रश्न गुन्हेगारी वर्तुळासह खुद्द शहर पोलीस दलातही चर्चेला आला आहे.

ठळक मुद्देअनेकांना अटक होण्याची शक्यता : आबूच्या ‘पोलीस मित्रा’चे काय होणार, सर्वत्र उत्सुकता !

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोवा, मुंबईसह देशातील विविध भागातील ड्रगमाफियांचे मध्य भारतातील नेटवर्क मजबूत करणारा ड्रग्जमाफिया आबू ऊर्फ फिरोज खान (वय ४७) याची संपत्ती तसेच त्याच्या संपर्कातील ड्रग्जमाफियांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र, आबूचे नेटवर्क मजबूत करणाऱ्या तसेच त्याच्यासोबत नेहमीच इकडेतिकडे दिसणाऱ्या शहरातील काही पोलीस कर्मचाऱ्यांचा तपास अधिकारी शोध लावणार काय, त्यांच्यावर कारवाई करणार काय, असा प्रश्न गुन्हेगारी वर्तुळासह खुद्द शहर पोलीस दलातही चर्चेला आला आहे.विदर्भातील प्रमुख ड्रग्जमाफिया समजल्या जाणाऱ्या कुख्यात आबूला गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी फिल्मीस्टाईल अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून, आबूची संपत्ती सील करण्याच्या हालचाली गुन्हे शाखेने सुरू केल्या आहेत. मोठा ताजबाग जवळच्या झोपडपट्टीत राहणारा आणि काही वर्षांपूर्वी लुनावर फिरणारा आबूकडे सध्या कोट्यवधींची संपत्ती आहे. चार ते पाच लाखांचे सोने त्याच्या नेहमीच अंगावर असते. लाखोंच्या आलिशान कार तसेच आलिशान बंगल्यात तो राहतो. आबूने साजीद तसेच अन्य काही मित्रांच्या माध्यमातून प्रारंभी बारमध्ये डान्स आणि गायन करणाºया तरुणींना ड्रग्जची लत लावली. त्यांच्या माध्यमातून अनेकांवर जाळे फेकून आबूने त्याची एक फौजच तयार केली. महाविद्यालयीन युवक-युवतींनाही त्याने प्रारंभी मित्रांच्या माध्यमातून मोफत एमडी पावडर देऊन नंतर त्यांनाही व्यसनाधीन केले. अशाप्रकारे तरुणाईसह अनेक धनिक मंडळींना नशेचे गुलाम बनवून आबूने कोट्यवधींची ठिकठिकाणी मालमत्ता जमविली आहे. त्याच्या बँकेतील खात्यात आणि लॉकरमध्येही मोठी संपत्ती मिळण्याचा पोलिसांचा अंदाज आहे.पगार सरकारचा, साथ आबूची !आबूची संपत्ती, त्याचे साथीदार आबूच्या संपर्कातील ड्रग्ज माफिया आणि तस्करांना पोलीस निश्चितपणे शोधणार आहे. पुढच्या काही तासात त्यामुळे आरोपींची संख्या वाढू शकते. मात्र, पोलिसांची नोकरी, सरकारचे पगार घेऊन आबूची नेहमी साथ देणाऱ्या, त्याला वाचविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ पोलीस अधिकारी कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आबूच्या कॉल डिटेल्समध्ये ड्रग्ज माफियांसारखेच काही पोलीस कर्मचाऱ्यांचेही नियमित संपर्काचे पुरावे मिळू शकतात. तपास पथक त्याचे काय करणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :Drugsअमली पदार्थmafiaमाफिया